|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जीएसटीमुळे देशात एकच करप्रणाली

जीएसटीमुळे देशात एकच करप्रणाली 

प्रतिनिधी / बेळगाव

 जीएसटी करप्रणालीमुळे संपुर्ण देशात एकच करप्रणाली राबविण्यात येणार आहे. जीएसटी विषयी व्यापाऱयांच्या मनात अनेक शंका व भिती आहे. परंतु प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱयाला जीएसटी अत्यंत लाभदायक आहे. त्यामुळे व्यापाऱयांना जीएसटीची माहिती कळावी व त्यांच्या समस्या निराकारण कराव्या. यासाठी मदत केंद्र सुरू करण्यात आल्याचे कमर्शिअल टॅक्स विभागाचे सहाय्यक आयुक्त के. बी. कुलकर्णी यांनी सांगितले.

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स व कमर्शिअल टॅक्स विभागाच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी कोल्ड्रींग हाऊस, नरगुंदकर भावे चौक येथे जीएसटी विषयी मदत केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शहरातील व्यापाऱयांच्या जीएसटी विषयीच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच जीएसटीच्या नोंदणीसाठी 15 जानेवारीपर्यंत हे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.

प्रारंभी टेडिंग कमिटीचे चेअरमन बाळासाहेब काकतकर यांनी उपस्थित अधिकारी वर्गाचे व व्यापाऱयांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकात टॅक्सेशन कमिटीचे चेअरमन दिलीप तिळवे म्हणाले की, एकाच वस्तूवर दोन राज्यांमध्ये भिन्न असणारी करप्रणाली आता जीएसटीमुळे एक होणार आहे. काळानुरूप व्यापारी वर्गाने देखील बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे व्यापाऱयांनी जीएसटीबाबत या मदत केंद्राचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

व्यापारी पाप्पाण्णा हुडदुग्गी यांनी वाहतूक कर, लक्झरी कर, एन्ट्री टॅक्स या सर्वांचे एकत्रितपणे तयार करण्यात आलेले जीएसटी हे नवे रूप असल्याचे यांनी सांगितले. व्यापाऱयांच्यावतीने मदत केंद्राला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल राजेंद्र हंडे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी कमर्शिअल टॅक्स विभागाच्या सुनिता नाईक, लक्ष्मी पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष सतिश गौरगोंडा, व्यापारी महेश बागी, बाबुलाल पुरोहित तसेच मोठया संख्येने व्यापारी उपस्थित होते.

Related posts: