|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » ठाण्यात भाजपची पोस्टरबाजी, युतीला विरोध

ठाण्यात भाजपची पोस्टरबाजी, युतीला विरोध 

ऑनलाईन टीम / मुंबई :

    महापालिकेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्याअसुन आता सगळेच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकत आहे. महापालिकेत युती करण्यास शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत झाले असले तरी ठाणेतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टवरून स्थनिक पातळीवर विरोध केला जात असल्याचे दिसुन येत आहे.

    ठाण्यात युती नको, विकास हवा! ठाण्यात शतप्रतिशत भाजपच हवा!… युती नाकार ठाण्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करा… आम्ही ठाणेकर अशा प्रकारचे पोस्टर ठाणे शहरात लावत, ठाणे भाजपने महापालिका निवडणुकांत युती करण्यास विरोध केला आहे. ठाण्यात आज भाजपच्या राज्यकार्यकरिणीची बैठक होत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर विरोध होऊनसुद्धा युती होणार का हे पहाव लागेल.

Related posts: