|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भोगीच्या खरेदीला महिलांची गर्दी

भोगीच्या खरेदीला महिलांची गर्दी 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

Aमकर संक्रांतीच्या सणाच्या अगोदर एक दिवस अगोदर येणाऱया भोगीसाठी  पारंपारीक पध्दतीने घरोघरी बाजरीची भाकरी, विविध भाज्या, राळयाचा भात असे पदार्थ बनविण्यात येतात. त्यामुळे भाज्या, तीळ, बाजरी, राळे, गाजर आदींच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे. भाज्यांच्या किंमतीतही वाढ झाली आहे.   

नवीन वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रातीकडे पाहिले जाते. भोगी दिवशी बाजरीच्या भाकरीबरोबर गाजर, कांदा पात, हळदी-कुंकु वाण (सुगड), तीळ-गुळ, तिळाचे दागिने खरेदी करीत संक्रातीच्या सणाची तयारी केली. तीळ-गुळाबरोबर सुवासिनीचे वाण देण्यासाठी विविध वस्तू खरेदीसाठी महिलांची बाजारात झुंबड उडाली आहे. मकर संक्रातीला सुवासिनी वाणामध्ये ओटीचे साहित्य, बिब्याची माळ, खाऊची पाने, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, डहाळे, ऊस, बोर घालून, पुजन सुगडावर हळदी कुंकु वाहतात आणि ववश्याचे पुजन करतात. संक्रातीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करून एकमेकांना तिळ-गुळ देऊन स्नेह वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या आवडीच्या वस्तू मैत्रीणींना भेट म्हणून देतात. बोरस्नान म्हणून लहान मुलांना आवडीने आकर्षक तिळगुळाचे दागिने घालतात. दरवर्षीपेक्षा थोडी हटके भेटवस्तू पर्स, मेकअप बॉक्स, ड्रेस, साडी अशा विविध वस्तू वाण म्हणून देण्याकडे महिलांचे लक्ष वेधले जात आहे.

Related posts: