|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काँग्रेसचे 27 उमेदवार जाहीर

काँग्रेसचे 27 उमेदवार जाहीर 

प्रतिनिधी / पणजी :

बऱयाच प्रतिक्षेनंतर काँग्रेस पक्षाने आपल्या 27 उमेदवारांची पहिली यादी काल गुरुवारी दुपारी जाहीर केली. काँग्रेसने 50… पेक्षा जास्त नवे चेहरे दिलेले असून जास्तीत जास्त युवकांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने :वेळ्ळी, कुठ्ठाळी येथे उमेदवार जाहीर केल्याने गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई तसेच युनायटेड गोवन्स पार्टीचे नेते बाबुश मोन्सेरात नाराज झाले असून त्यामुळे आघाडी न होण्याचीच शक्यता वाढली आहे. पक्षाचे उपाध्यक्ष मोती देसाई व सरचिटणीस एम. के. शेख यांनी पक्षाने 40 ही मतदारसंघात उमेदवारी देण्याची तयारी ठेवल्याचे जाहीर केले. पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता असून साऱयांचे लक्ष दिल्लीकडे लागले आहे.
काँग्रेस पक्षाचे अ. भा. सरचिटणीस मधुसूदन मिस्त्राr यांनी नवी दिल्लीहून गोव्यातील काँग्रेसची पहिली 27 उमेदवारांची यादी भाजपची यादी आल्यानंतर तासाभरातच जाहीर केली. ज्या पक्षांबरोबर आघाडी करण्यासाठी बोलणी चालू ठेवली आहे त्या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.
बाबुश, विजय यांच्या पदरी नाराजी
युतीची बोलणी करण्यासाठी गेलेले बाबुश मोन्सेरात, विजय सरदेसाई यांच्यापैकी मोन्सेरात हे गुरुवारी सकाळी गोव्यात परतले. मोन्सेरात यांना फक्त पणजीत काँग्रेस पक्ष पाठिंबा देईल. त्यांनी कुठ्ठाळी मतदारसंघ रमाकांत बोरकर यांच्यासाठी द्यावा अशी केलेली मागणी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी फेटाळून लावली आहे. याशिवाय गोवा फॉरवर्डने शिवोली, वेळ्ळी, साळगाव आणि फातोर्डा ह 4 मतदारसंघ काँग्रेसकडे मागितले असता काँग्रेसने त्यांना शिवोली, पर्वरी आणि फातोर्डा या तीनच जागांची ऑफर दिली आहे.

Related posts: