|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews » सायकल कुणाची?, निवडणूक आयोग आज देणार निर्णय

सायकल कुणाची?, निवडणूक आयोग आज देणार निर्णय 

ऑनलाईन टीम / लखनऊ :

गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पक्षामध्ये वेगवेगळा विषयावर दंगल सुरू असल्याचे दिसून येत आहे. सायकल चिन्हावरून सुरू असलेला पिता पुत्रांमधल्या वादाला आज निवडणूक आयोग पुर्ण विराम देणार आहे. नेमकी सायकल कोणाची हा निर्णय आज निवडणूक आयोग देण्याची शक्यता आहे.

उत्तरप्रदेशमधील निवडणूकीमध्ये अजून काही डावपेच आहेत का हे देखील समोर येण्याची शक्यता आहे. मुलायम सिंह आणि आखिलेश यादव पिता -पुत्रात सुरू असलेल्या दंगलीत निवडणूक आयोग पंचाची भुमिका निभवत आहे. आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार असून त्यानंतर निर्णय जाहिर होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षात दोन गट पडले असून दोघांनीही सायकल चिन्हावरून आपला दावा ठोकला आहे.

Related posts: