|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वैभववाडी नगराध्यक्षपदी संजय चव्हाण

वैभववाडी नगराध्यक्षपदी संजय चव्हाण 

वैभववाडी : वाभवे- वैभववाडी नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी संजय चव्हाण, तर उपनगराध्यक्षपदी संपदा राणे यांची निवड करण्यात आली. संपदा राणे या वाभवे-वैभववाडी नगर पंचायतीच्या पहिल्या महिला उपनगराध्यक्ष ठरल्या.

वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीची स्थापना होऊन सव्वा वर्षाचा कालावधी झाला असून वींद्र रावराणे यांनी पक्षाच्या धोरणानुसार नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उपनगराध्यक्ष असलेले संजय चव्हाण यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या या पदांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी निता शिंदे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे संजय चव्हाण यांनी उमेदवारी सादर केली. सेना-भाजप युतीकडून सुचित्रा कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या पदासाठी निवडणूक घेतली असता संजय चव्हाण यांनी 9 विरुद्ध 7 मतांनी विजय मिळविला.

उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे सौ. संपदा शिवाजी राणे, तर सेना-भाजप युतीकडून सुप्रिया तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या पदासाठी हात वर करुन मतदान करण्यात आले. यामध्ये काँग्रेसच्या संपदा शिवाजी राणे यांनी 9 विरुद्ध 7 मते मिळवत विजय मिळविला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचे काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी अभिनंदन केले. यावेळी जि. प. बांधकाम सभापती दिलीप रावराणे, तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, नासीर काझी, सभापती शुभांगी पवार, महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, विश्राम राणे, बाळा हरयाण, अंबाजी हुंबे, दिगंबर मांजरेकर, योगेश रावराणे, संजय सावंत, प्रदीप रावराणे, यांच्यसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

 रवींद्र तांबे यांचे मत युतीच्याच पारडय़ात

भाजप-सेनेच्या अधिकृत गटात सामील होऊन नंतर काँग्रेस पक्षात दाखल झालेले नगरसेवक रवींद्र तांबे यांनी काँग्रेस पक्षात येऊनही भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुचित्रा कदम यांना अनुमोदन दिलेले होते. पक्षांतर बंदी लागून आपले नगरसेवक पद धोक्यात येऊ नये, यासाठी त्यांना सुचित्रा कदम यांच्या बाजुनेच मत देणे भाग पडले.