|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अक्षरसिंधुच्या ‘गावय’ची मुंबईत चमक

अक्षरसिंधुच्या ‘गावय’ची मुंबईत चमक 

कणकवली : कामगार कल्याण ठाणे विभागाने मुंबई-विक्रोळी येथे आयोजित केलेल्या 64 व्या खुल्या नाटय़ स्पर्धेत येथील कामगार केंद्रातर्फे अक्षरसिंधुचे संस्थापक सदस्य तसेच देवगडचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण लिखित आणि सुहास वरुणकर दिग्दर्शित सादर केलेल्या अक्षरसिंधुच्या ‘गावय’ नाटकाने सांघिक प्रथम क्रमांक प्राप्त केला. एकूण आठ पारितोषिके प्राप्त करीत सिंधुदुर्ग रंगभूमीच्या वाटचालीत या नाटकाने इतिहास निर्माण केला. सत्य घटनेवर आधारित हे दोन अंकी नाटक असून स्पर्धेत या नाटकाने प्रेक्षकांबरोबरच परीक्षकांचीही मने जिंकली.

स्पर्धेत विविध 24 नाटय़ संघांनी आपली नाटके सादर केली. यात कणकवली कामगार केंद्राचे संचालक संतोष नेवरेकर यांच्या सहकार्यातून अक्षरसिंधु साहित्य कला मंचच्या कलाकारांनी 4 जानेवारी रोजी ‘गावय’ नाटक सादर केले. त्याला सांघिक प्रथम, दिग्दर्शन सुहास वरुणकर प्रथम, पुरुष अभिनय किशोर कदम यांना रामा या भूमिकेसाठी प्रथम, तर विजय चव्हाण यांना बाबा दळी या भूमिकेसाठी अभिनयाचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला. स्त्राr भूमिकेसाठी पल्लवी माळवदे यांना प्रथम, नेपथ्यासाठी प्रा. हरिभाऊ भिसे, संजय राणे यांना प्रथम, पार्श्वसंगीतासाठी प्रा. अमर पवार यांना द्वितीय, प्रकाश योजनेसाठी प्रा. सुभाष कदम, ऋषिकेश कोरडे यांना द्वितीय अशी पारितोषिके प्राप्त झाली. स्पर्धेत कल्याण केंद्राच्या ‘ओय लेले’ या नाटकाला द्वितीय क्रमांक, तर कुर्ला कामगार वसाहतच्या ‘अपूर्णांक’ नाटकाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती निसळ, दीप चहांदे, अनंत पेडणेकर यांनी काम पाहिले.

‘गावय’ नाटकात विजय चव्हाण, किशोर कदम, पल्लवी माळवदे यांच्यासह संजय राणे, प्रा. मिलिंद गुरव, प्रा. शेखर कल्याणकर, ऋतुजा कोरडे, डॉ. हर्षदा माळवदे, अमोल कदम, सौरभ सावंत, निनाद उचले, सिद्धेश उचले, विक्रांत सामंत, सुभाष कदम, सुधीर घवाळी, सुनील महाजन, सीताराम इकाळे, भास्कर फोपे, गोविंद खोचडे, रघुनाथ झोरे, संतोष पोयेकर आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

 लेखकाची चमकदार कामगिरी

विजय चव्हाण हे अधिकारी असले, तरी नाटक-चित्रपटातील अभिनयामुळे त्यांची कलाकार म्हणून ओळख आहे. पण लेखक म्हणून हे त्यांचे पूर्ण लांबीचे पहिलेच नाटक आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेल्या ‘झंपय’ एकांकिकेला अल्फा करंडक मिळाला होता. ‘गावय’ हे नाटक याआधी एसटी विभागातर्फे अहमदनगर विभागात सादर झाले होते, तेथेही ते प्रथम आले होते. त्यामुळे चव्हाण यांच्या या पहिल्याच नाटकला घवघवीत यश मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related posts: