|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आष्टा शहराच्या विकासासाठी भरीव प्रयत्न करणारः सौ. स्नेहा माळी

आष्टा शहराच्या विकासासाठी भरीव प्रयत्न करणारः सौ. स्नेहा माळी 

वार्ताहर/ आष्टा

आष्टा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी भरीव प्रयत्न करणार आहोत. ज्या उद्देशाने शहरातील नागरिकांनी पालिकेत नगराध्यक्षा म्हणून पाठविले आहे, तो उद्देश सार्थ ठरविणार असल्याची ग्वाही आष्टय़ाच्या नगराध्यक्षा सौ. स्नेहा माळी यांनी केले.

आष्टा येथील चर्मकार विकास मंडळ, गजराज पुरुष बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आष्टा पालिकेच्या नूतन नगराध्यक्षा सौ. स्नेहा माळी, नगरसेवक झुंझारराव पाटील, राजू पाटील, संभाजी माळी यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. स्नेहा माळी बोलत होत्या. यावेळी भैरवनाथ पाणी पुरवठा संस्थेचे संचालक बाळासो शिंदे, शिवाजीराव पाटील पतसंस्थेचे संचालक शामराव पवार, माणिक शिंदे, संदीप माळी, प्रशांत महाजन, सचिन शिंदे, प्रदीप माळी, अरविंद वाघमारे, शिरीष सावंत, सौ. प्रभावती शिंदे, सौ. माधुरी शिंदे, सौ. रतन शिंदे महेश घोरपडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना सौ. स्नेहा माळी म्हणाल्या, आष्टा शहरात गेल्या दहा ते पंधरा वर्षात माजी आमदार विलासराव शिंदे व आमदार जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून विकासकामांचा डोंगर उभारला गेला आहे. पालिका निवडणुकीत मतदारांनी विकासकामांच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात पालिकेच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविताना मतदारांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करणार आहोत.

माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील म्हणाले, दिपकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चर्मकार विकास मंडळ व गजराज पुरुष बचत गट कौतुकास्पद काम करीत आहेत. चर्मकार समाजातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम चर्मकार विकास मंडळ करीत आहे. माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या कल्पक दृष्ट्रीतून शहराचा सर्वांगिण विकास होत आहे. शिंदे साहेबांच्या मुळे शहरातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना हक्काची घरकुले मिळाली आहेत. आष्टा पालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना राबविल्या आहेत. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य जनता ही नेहमीच शिंदे साहेबांच्या पाठीशी राहीली आहे. सत्कार व शुभेच्छामुळे सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना बळ मिळत असते. चर्मकार विकास मंडळ व गजराज बचत गटाच्याने आम्हाला बळ देण्याचे काम केले आहे.

स्वागत दिपक शिंदे यांनी केले. आभार बाळासो शिंदे यांनी मानले.

Related posts: