|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आष्टय़ातील पत्रकारांना पालिका घरकुले देणारः विशालभाऊ शिंदे

आष्टय़ातील पत्रकारांना पालिका घरकुले देणारः विशालभाऊ शिंदे 

वार्ताहर/ आष्टा

आष्टा शहराच्या जडणघडणीत शहरातील पत्रकारांनी अनमोल योगदान दिले आहे.  वाईट गोष्टीवर अंकुश ठेवताना पत्रकारांनी सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावर प्रकाझोत टाकीत ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन आष्टय़ाचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक झुंझारराव पाटील यांनी केले.

आष्टा येथील शिवाजीराव पाटील(आप्पा) नागरी सहकारी पतसंस्था, शिवाजीराव पाटील(आप्पा) सार्वजनिक वाचनालय, झुंझारराव पाटील(दादा) युवा मंच यांच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त शहरातील पत्रकार संजय बापट, उत्तम कदम, गजानन शेळके, सुरेंद्र शिराळकर, तानाजी टकले, महेश पाटील, सुनील पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झुंझारराव पाटील बोलत होते. याप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब हालुंडे, उपाध्यक्ष केशव माळी, सचिव सुनील पाटील, संचालक राजू पाटील, दिपक शिंदे, शामराव पवार, अविनाश विरभद्रे उपस्थित होते. यावेळी शिवाजीराव पाटील(आप्पा) पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही उपस्थित पत्रकारांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना झुंझारराव पाटील पुढे म्हणाले, अलिकडच्या काळात पत्रकारितेपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. पत्रकारतिचे स्वरुप बदलत चालले आहे. ग्रामीण भागात काम करणाऱया पत्रकारांसमोर अनेक अडचणी आहेत. मात्र त्या अडचणींचा सामना करीत पत्रकार समाजाला दिशा देण्याचे काम करीत आहेत. आष्टा शहरातील पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाहीही शेवटी त्यांनी दिली.

स्वागत उपाध्यक्ष केशव माळी यांनी केले. आभार सचिव सुनील पाटील यांनी मानले.

Related posts: