|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बहुजन क्रांती मोर्चाची आज दुचाकी रॅलीने रंगीत तालिम

बहुजन क्रांती मोर्चाची आज दुचाकी रॅलीने रंगीत तालिम 

प्रतिनिधी / रत्नागिरी

ओबीसी प्रवर्गाच्या न्याय हक्क मागण्यांसाठी काढण्यात येणाऱया बहुजन क्रांती मोर्चाच्या नियोजन अंतिम टप्प्यात गेले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अखेरचा टप्पा म्हणून प्रत्येक गावागावात केल्या जाणाऱया जनजागृतीबरोबरच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणीही भव्य जनजागृती रॅली काढण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी शहरातही आज शनिवार 14 रोजी मोटार रॅलीचे आयोजन केले आहे.

बहुजन क्रांती मोर्चाच्या नियोजनासंदर्भात नुकतीच रत्नागिरीतील कुणबी भवन येथे मोर्चा संयोजन समितीची बैठक पार पडली. तसेच संयोजन समिती व अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा प्रशासन यांच्यासमवेत बैठक झाली. मोर्चा व सभास्थळ, मोर्चामार्ग, वाहनतळ याबाबतचे नियोजनाविषयी या बैठकीत सकारात्मक निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे संयोजन समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे. 16 जानेवारी रोजी मोर्चाच्या ठिकाणी सभामंडप, मोर्चेकऱयांच्या येण्या-जाण्याचा मार्ग, प्रारंभ, व समाप्ती याठिकाणीही रंगीत तालीम घेण्यात आली आहे. संपूर्ण मोर्चाच्या यशस्वीतेसाठी चोख व्यवस्था ठेवण्यासाठी विविध समित्या कार्यरत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वाहन समिती, आरोग्य समिती, पाणी समिती, नियोजन समिती, सभामंडप समिती, अर्थ समिती अशा कामांची विभागणी करून त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्यातील संयोजन समित्या गावागावातून वाडी, वस्त्यांपर्यंत व घरा-घरापर्यंत कार्यकर्त्याद्वारे जनजागृती केली जात असल्याचे सांगण्यात आले. जिल्हय़ातून लाखोंच्या संख्येने मोर्चेकरी ओबीसी समाजबांधव रत्नागिरीत धडकणार आहेत. संविधानिक हक्क व अधिकारांपासून स्वातंत्र्योत्तर 69 वर्षांनंतरही वंचित, शोषित, पिडीत राहिलेल्या बहुजन जनतेच्या आक्रोशाचा, सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य, समतेचा लढाच असेल असे संयोजन समितीचे दिपक राऊत, बी.के.पालकर यांनी सांगितले आहे.

Related posts: