|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुंकळ्ळीत राजन नाईक यांचा घरोघरी प्रचारावर भर

कुंकळ्ळीत राजन नाईक यांचा घरोघरी प्रचारावर भर 

प्रतिनिधी/ कुंकळ्ळी

कुंकळ्ळीचे आमदार व मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांनी जोरदार प्रचार चालविला असून कार्यकर्त्यांच्या फौजफाटय़ासह घरोघरी भेट देण्यावर त्यांनी भर दिला आहे. पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची पुस्तिका यावेळी त्यांच्याकडून वितरित केली जात आहे.

भाजपाच्या राजवटीत अनेक विकासकामे राबविण्याबरोबर विविध योजनांचा लाभ नागरिकांच्या घरोघरी पोहोचविण्यात आला. भाजपाने सर्वसामान्य नागरिकांना डोळय़ांसमोर ठेवून सरकार चालविले. आजच्या घडीला प्रत्येक घरातील व्यक्ती भाजपाविषयी सकारात्मक विचार करत आहे. कुंकळ्ळीत पुन्हा एकदा कमळच उमलेल याची खात्री मतदारच देत आहेत, असे प्रचारासंदर्भात बोलताना कुंकळ्ळी भाजप मंडळ अध्यक्ष मारूती देसाई यांनी सांगितले.

प्रचारात महिलाही मोठय़ा प्रमाणात सहभागी होत असून ही जमेची बाजू आहे, असे देसाई म्हणाले. भेटीदरम्यान मतदारांचा चांगला पाठिंबा लाभत आहे. मतदारांचा विश्वास संपादन करण्यात निश्चितच यश लाभले आहे, असा दावा आमदार नाईक यांनी केला. आतापर्यंत देमानी, भिंवसा, सिद्धनगर, मड्डी, माड्डीकट्टा, पायराबांद, कोटामळ, कोंब – पारिकोटो, बाजार अशा 40 टक्के भागांमध्ये प्रचार करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या प्रचारादरम्यान मारूती देसाई, मंडळाचे सचिव संदीप हरमलकर, महिला मोर्चाच्या सुनयना ना. गावकर, मनीषा नाईक, देवयानी च्यारी तसेच रमेश देसाई, शंकर पंढरी देसाई, विशाल कालेकर, हेमंत नाईक, अमिना शेख, जयतून, सूचिता नाईक, साजिदा शेख, निशा नाईक, पॉलिता कार्नेरो, नागेश चितारी, मुबिना शेख, अशोक फडते, वैभव फोंडेकर, प्रभाकर देसाई, प्रेमदीप देसाई, श्रीपाद देसाई, मधुकर देसाई, साहील शेख, दिव्या नाईक, रेशमी नाईक, दामिनी नाईक, दामू नाईक, आशिष फळदेसाई, विकास वेळीप, राजू गावकर, उल्हास देसाई, सखिरा शेख, सुषमा नाईक, अमिता नाईक आदी प्रमुख कार्यकर्त्यांचा सहभाग राहत आहे.

Related posts: