|Friday, December 6, 2019
You are here: Home » Top News » उदयनराजे भाजपमध्ये आले तर आनंद वाटेल -चंद्रकांत पाटील

उदयनराजे भाजपमध्ये आले तर आनंद वाटेल -चंद्रकांत पाटील 

ऑनलाईन टीम / सातारा :

  राष्ट्रवादी काँग्रसचा बालेकिल्ला असणाऱया पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्याच्यादृष्टीने भाजप आणखी एक महत्त्वपूर्ण डाव टाकला आहे. भाजपने आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनाच गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उदयनराजे भोसले भाजपमध्ये आले तर त्याचा आनंदच आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

साताऱयातील उंब्रज इथे पाटील बोलत होते. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत्। आदरणीय असलेल्या उदयनराजेंना आम्ही मुजरा करतो. ते जर भाजपमध्ये आले तर आनंदच आहे,असे पाटील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकत्याच सातारा येथील कार्यक्रमात उदयनराजे यांच्यावर केलेल्या अप्रक्ष टीकेच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related posts: