|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » जेवण 6 हजारांचे अन् टिप चक्क 83 हजारांची !

जेवण 6 हजारांचे अन् टिप चक्क 83 हजारांची ! 

ऑनलाईन टीम / लंडन :

आपण कधी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो असल्यास हॉटेलमधील वेटरला बिलासोबत 10-20 रुपये किंवा झालेल्या बिलापेक्षा कमी पैसे देतो. मात्र, लंडनमधील एका धनाडय़ व्यावसायिकाने झालेल्या बिलाच्या तब्बल बारापट रक्कम वेटरला देऊ केली आहे.

‘द इंडियन ट्री रेस्टॉरंट’ या हॉटेलमध्ये लंडनमधील धनाडय़ व्यावसायिक जेवणासाठी हॉटेलमध्ये आले होते. तेव्हा त्यांचे जेवणाचे बिल सहा हजार रुपये झाले होते. त्यांचे बिल घेऊन आलेल्या वेटरला त्यांनी टिप म्हणून बिलाच्या तब्बल बारापट म्हणजे 83 हजार रुपये त्याला देऊ केले. जेव्हा त्या वेटरने टिपची रक्कम पाहिली असता तेव्हा त्याला विश्वासच बसला नाही.

याबाबत त्या व्यावसायिकाने सांगितले, शेफ बाबू यांच्या हाताचे जेवण आपल्याला प्रचंड आवडते. जेव्हा कधी मी घरी येतो तेव्हा त्यांच्या हातचे जेवण नक्की जेवतो. त्यांच्या या उत्कृष्ठ जेवणाबद्दल मी त्यांना 83 हजार रुपयांची टिप दिली आहे.