|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » महात्मा गांधींमुळे नव्हे; मोदींमुळे खादीचा खप : हरियाणाच्या मंत्र्यांची मुक्ताफळे

महात्मा गांधींमुळे नव्हे; मोदींमुळे खादीचा खप : हरियाणाच्या मंत्र्यांची मुक्ताफळे 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली ;

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केवायसी कॅलेंडरवरील छायाचित्राचा वाद आता शिगेला पोहचला असून हरियाणाचे कॅबिनेट मंत्री अनिल विज यांनीदेखील या वादात उडी मारली असून महात्मा गांधीमुळे नव्हे; तर मोदींमुळे खादीचा खप वाढला आहे, अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली आहेत. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी केवायसी कॅलेंडर आणि डायरीच्या मुखपृष्ठावर महात्मा गांधींऐवजी नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आले होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता. यावरून मोदींवर चौफेर टीका होताना दिसत आहे.हरियाणाचे कॅबिनेट मंत्री अनिल वीज यांनी याबाबत मोदींचे सर्मथन केले आहे. ‘खादीचा खप मोदींमुळे वाढला आहे, महात्मा गांधीमुळे खादीचे उत्पन्न बुडाले आहे. मोदींमुळे खादीच्या उत्पन्नात 14 टक्क्यांनी वाढले आहे,’ असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

Related posts: