|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » देहव्यापारासाठी पाक लष्कर करते पश्तून मुलींचे अपहरण

देहव्यापारासाठी पाक लष्कर करते पश्तून मुलींचे अपहरण 

वृत्तसंस्था/  नवी दिल्ला

पाकिस्तानी लष्कराचे विकृत रुप पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. पश्तूत कार्यकर्ता उमर दाऊद खट्टक यांनी पाकिस्तानी जवानांनी 100 पश्तून मुलींचे अपहरण केल्याचा आरोप केला. या मुलींना लाहोरच्या देहव्यापारात ढकलण्यात आले आहे. पाकिस्तानी जवान दरदिवशी पश्तून मुलींवर बलात्कार करत असतात अशी खळबळजनक माहिती त्यांनी दिली.

पाककडून अणू हल्ल्याची धमकी दिली जात असल्याने आतापर्यंत 5 लाख लोकांनी पलायन केले आहे. जवानांनी अनेक गावे उद्ध्वस्त केली आहेत आणि सातत्याने हल्ले करणे चालूच ठेवले आहे. पश्तूनचे रहिवासी पाकिस्तानमधून स्वतंत्र होऊ इच्छितात असे खट्टक यांनी सांगितले.

पाकिस्तानने शेकडो पश्तूनी मुलींचे स्वात आणि वजीरिस्तानमधून अपहरण करत त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले आहे. पाकिस्तानी लष्कर क्षेत्रीय लोकांना त्यांच्या भागातून हुसकावून लावत तेथे दहशतवादी तळ स्थापन करू इच्छिते असा दावाही त्यांनी केला.

या अत्याचारामुळे पश्तूनिस्तान लिबरेशन आर्मीची निर्मिती करत आहोत. पाकिस्तान आणि दहशतवाद विरोधात लवकरच संघर्ष सुरू केला जाईल असे खट्टक यांनी सांगितले. त्यांनी याकरता जागतिक समुदायाकडे मदतीचे आवाहन केले आहे.