|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » युरोपवर दाटले युद्धाचे ढग

युरोपवर दाटले युद्धाचे ढग 

मॉस्कोः

 पोलंडमध्ये 3000 अमेरिकन जवानांच्या तैनातीनंतर मॉस्कोमध्ये देखील लष्करी हालचाली वाढल्या आहेत. रशियाने विमानाला हवेत लक्ष्य करणारे क्षेपणास्त्र एस-400 तैनात केले आहे. मॉस्कोच्या बाहेर एस-400 सिस्टीम लाँचर उभे झाले आहेत.

पोलंडच्या सीमेवर रशियाच्या विमानविरोधी तुकडीच्या जवानांनी मोर्चा सांभाळला आहे. अजस्त्र रडारसमवेत उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात तज्ञांनी शत्रूला प्रत्युत्तर देण्याची तयारी पूर्ण केली आहे. एस-400 सिस्टीम आपल्या क्षेपणास्त्रांद्वारे 400 किलोमीटरच्या कक्षेत शत्रूचे कोणतेही विमान किंवा क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करते.

मोर्चेबंदीमुळे युद्धजन्य वातावरण

अमेरिकेद्वारे पोलंडमध्ये आपल्या 3000 जवानांच्या तैनातीचा उद्देश रशियाच्या कोणत्याही हल्ल्याला रोखणे आहे. परंतु लष्करी वाहने, तोफा आणि रणगाडय़ांनी सज्ज अमेरिकेच्या लष्करामुळे रशिया देखील सतर्क बनला आहे. अमेरिकेचे हे जवान पोलंडच्या मदतीसाठी आले आहेत, पोलंड रशियाच्या लष्करी हालचालींमुळे अस्वस्थ बनला आहे. परंतु जवळपास 3000 जवानांची तैनाती फक्त कठोर संदेश देण्यासाठी केली जात नसल्याचेही समजते. युरोपमध्ये ज्याप्रकारे मोर्चेबंदी सुरू झाली आहे, त्याने युद्धजन्य वातावरण तयार होत असल्याचे दिसून येत आहे.

Related posts: