|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » क्रिडा » युक्री भांब्री पराभूत

युक्री भांब्री पराभूत 

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्यासाठी पात्र फेरीचे सामने खेळविले जात आहेत. शनिवारी भारताच्या युकी भांब्रीला पात्र फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने आता या स्पर्धेच्या पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये भारताचा एकही टेनिसपटू दिसणार नाही. पात्र फेरीच्या तिसऱया सामन्यात अमेरिकेच्या इस्कोबेडोने भारताच्या बिगर मानांकित युकी भांब्रीवर 6-7 (2-7), 6-2, 6-4 अशी मात केली. हा सामना दोन तास चालला होता.

ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत पुरूष एकेरीत भारताचा एकही स्पर्धक पात्र ठरू शकला नाही. मात्र दुहेरीत सानिया मिर्झा, लियांडर पेस, रोहन बोपण्णा, पुरूव राजा, डी. शरण या भारतीय टेनिसपटूंचा सहभाग राहिल.

Related posts: