|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोसायटय़ामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सक्षमः आ. जयंतराव पाटील

सोसायटय़ामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सक्षमः आ. जयंतराव पाटील 

बहादूरवाडीत आबासाहेब खोत सोसायटीचा नामकरण सोहळा उत्साहात

वार्ताहर/ आष्टा

आबासाहेब विकास कार्यकारी सोसायटीचे कार्य कौतुकास्पद आहे. सोसायटीने बहादुरवाडीतील शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचविण्याचे काम केले आहे. तालुक्यातील इतर सोसायटीनी आबासाहेब खोत सोसायटीचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री, आमदार जयंतराव पाटील यांनी केले.

बहादूरवाडी येथील आबासाहेब खोत विकास कार्यकारी सोसायटीच्या नामकरण सोहळयाप्रसंगी बोलत होते. यावेळी वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय पाटील, सोसायटीचे अध्यक्ष मारुती खोत, माजी अध्यक्ष डॉ. सतीश माने, राजारामबापू दुध संघाचे माजी संचालक संग्रामसिंह घोरपडे, युवा नेते मंगेश माने, भिमराव पाटील, माऊली ग्रुपचे अध्यक्ष महेश खोत, संचालक मानसिंग दळवी, मारुती खोत, नागनाथ वडार, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष कुमार खोत,चंद्रकांत खोत यांच्यासह सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. प्रारंभी सोसायटीच्या नामफलकाचे अनावरण आमदार जयंतराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार जयंतराव पाटील म्हणाले, विकास सोसायटय़ा या ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आहेत. सोसायटय़ामुळे ग्रामीण भागाच्या विकासास गती आली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकऱयांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्याचे काम केले आहे. आबासाहेब खोत सोसायटीने पारदर्शक कारभार केला आहे. त्यामुळे सभासदांचा सोसायटीवर विश्वास आहे. सोसायटीची आकर्षक इमारत आहे. सोसायटीने सभासदांना विविध सेवा सुविधा पुरविल्या आहेत. सभासदांना आर्थिक पुरवठा करण्याचे काम सोसायटीने केले आहे. ग्रामीण भागातील सोसायटया सक्षम होण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत. सभासदांनी सोसायटीच्या प्रगतीसाठी भरीव प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही शेवटी त्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश माने म्हणाले, आमदार जयंतराव पाटील यांच्यामुळे वाळवा तालुक्यातील सहकारास बळकटी आली आहे. सोसायटया सक्षम होण्यासाठी आ. जयंतराव पाटील यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेब खोत विकास सोसायटी प्रगतीची शिखरे गाठीत आहे. शेतकऱयांना समृध्द करणे हा एकमेव उद्देश समोर ठेवून आबासाहेब खोत सोसायटी कार्यरत आहे. यापुढील काळातही सभासदांना विविध सोई सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे अभिवचनही शेवटी त्यांनी दिले.

स्वागत सोसायटीचे अध्यक्ष मारुती खोत यांनी केले. आभार चंद्रकांत खोत यांनी मानले.

Related posts: