|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भिलवडी घटनेतील एक आरोपी ताब्यात

भिलवडी घटनेतील एक आरोपी ताब्यात 

प्रतिनिधी/ भिलवडी

माळवाडी ता. पलूस येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खुन केलेल्या घटनेतील एक आरोपी पोलिसांनी दुपारी तीन वाजता अटक केला. आरोपीचे नाव प्रशांत उर्फ सोन्या उर्फ हिमेश राजाराम सोंगटे (26) रा. माळमाडी, ता. पलूस असे आहे.

यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेली माहिती अशी, या घटनेतील आरोपी पर्यंत तपास गतीमान करुन भक्कम पुरावे जमा केले. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचा गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे. 2013 मध्ये त्याच्यावर एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग व छेडछाड केल्याचा गुन्हा पलूस ठाण्यात दाखल आहे.

पाच जानेवारी रोजी पिडीत मुलगी आईबरोबर भांडण करुन 8.30 वा. घरातून बाहेर पडली. यानंतर मुलगी मेनरोडने चालत जात असता आरोपी प्रशांत सोंगटे याने तिचा पाठलाग करुन तिच्यावर अत्याचार केला व अत्याचाराची घटना पोलिसांना समजेल म्हणून तिचा तोंड दाबून खुन केला व पूरावे नष्ट करण्याच्या हेतूने त्याने हालचाल केली. तर, दुसऱया दिवशी हाच आरोपी निषेध मोर्चा व पॅन्डल मार्च मध्ये सक्रीय होता. परंतु पोलिसांनी या आरोपीच्या हालचालीवर पाळत ठेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता काही भक्कम पुरावे हाती लागले. व या आरोपीवर पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनंतर भिलवडी-माळवाडीला अनेक लोकप्रतिनिधींनी भेट देऊन आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी केली. तर, या घटनेतील आरोपी कोण आहे हे पाहण्यासाठी भिलवडी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली होती. या घटनेत आणखी दोन आरोपी असण्याची दाट शक्यता आहे. सापडलेल्या आरोपींनी मुलिवर माळवाडी-खंडोबाचीवाडी या परिसरात अत्याचार करुन तिला भिलवडी हद्दीतील हायस्कूल समोरील चोपडे मळ्यानजीक फेकुन दिले. तर, वैद्यकिय अहवाल आणि शास्त्रीय तपास याबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता ठेवली आहे. या घटनेत आणखी दोन आरोपी असण्याची दाट शक्यता आहे. या अनुषंगाने पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे. आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी भक्कम पुरावे न्यायालयासमोर टिकावेत यासाठी पोलिसांनी तपास सुरु ठेवला आहे.

सदरच्या गुह्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. आरोपिने गुन्हा करताना पुरावे मागे ठेवले नव्हते. कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी याबाबत घटनास्थळी भेट देऊन तपासकामात मार्गदर्शन केले व दिशा दिली. जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे, पोलीस उपाधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, अशी वेगवेगळी पथके करुन रवाना करुन पिडीत मुलीच्या संबंधीतांशी चौकशी व साक्षीदाराकडे चौकशी केली. सदर गुह्याचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे, पोलीस उपाधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे,  उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर, इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली शिंदे, निवासी उपाधिक्षक सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हे अन्वेशण सांगलीचे बाजीराव पाटील, गुंडा विरोधी पथकाचे विश्वनाथ घनवट, भिलवडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हिरुगडे, गुन्हे अन्वेषन पथक तासगावचे मिलींद पाटील यांच्यासह अन्य पोलीस स्टाफ यांनी विशेष प्रयत्न केले.

घटनाक्रम

पाच जानेवारीला सायंकाळी पिडीत मुलगी साडेआठ वाजता घरातून बाहेर पडली.

साडेनऊ वा. पिडीत मुलीचा आरोपी कडून पाठलाग करुन अत्याचार करुन खून, पुरावे नष्ट करण्याच्या हेतून मृतदेह घटनास्थळा पासून लांब टाकला.

सकाळी साडे वाजता पिडीत मुलीचा मृतदेह हायस्कूल समोरील चोपडे मळ्यात उकींरडय़ात कडेला आढळला.

पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस सहाय्यक निरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांची घटनास्थळी भेट व तपासाची दिशा.

दरम्यान चंद्रकांतदादा पाटील, सदाभाऊ खोत, आ. जयंतराव पाटील, आ.डॉ. पतंगराव कदम, आ. मोहनराव कदम, भारत पाटणकर, विजयाताई रहाटकर, तृप्ती देसाई यांनी भेट देऊन माहिती घेतली.

पोलिसांनी तपासाबाबत 115 व्यक्तीकडे कसून चौकशी. पिडित मुलीच्या आईसह नातेवाईक वर्गातील मैत्रीणी, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडे कसुन चौकशी.

शनिवारी दुपारी तीन वाजता आरोपी प्रशांत सोंगटे याला अटक व जिल्हा पोलीस प्रमुखांची पत्रकार परिषदेत आरोपीचे नाव जाहीर.

या गुह्यात आणखी दोन आरोपी असण्याची दाट शक्यता.

Related posts: