|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » करमूठगी लावून सिद्धेश्वरांच्या योगदंडास स्नान

करमूठगी लावून सिद्धेश्वरांच्या योगदंडास स्नान 

वार्ताहर/ सोलापूर

श्री सिद्धेरामेश्वरांच्या योगदंडास करमुटगी लावून स्नान घालण्यात आले. हिरेहब्बु व देशमुखांच्या हस्ते पूजा होऊन मिरवणुकीने संमती कट्टयाजवळ येऊन थांबल्या व तेथे आल्यानंतर प्रािम श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडास करमुटगी लावून स्नान घालण्यात आले व नंतर पालखीतील मुर्तीस करमुटगी लावून स्नान घातले. त्यानंतर एक ते सात नंदीध्वजांना करमुटगी लावून स्नान घातले. अमृत लिंगाजवळ हिरेहब्बु व देशमुख यांच्या हस्ते गंगा पुजनाचा धार्मिक विधी झाला. त्यानंतर देशमुखांना हिरेहब्बु हे विडा दिला. गर्भ मंदिरातील श्री सिद्धरामेश्वरांच्या पादुकास करमुटगी लावून ते पादुका धुवुन हिरेहब्बु विडा दितात. मंदिरातील गाभाऱयात श्री सिद्धरामेश्वरांच्या पादुकास करमुटगी लावून ते पादुका धुवुन त्यांनतर हिरेहब्बु यांनी गदगीची/मुर्तीची आरती केली. नंतर नंदीध्वज दुपारी एक वाजता परत हिरेहब्बु वाडय़ात गेले.

सकाळी करमूठगीच्या विधीनंतर सायंकाळी पाच वा. हिरेहब्बु व देशमुख यांच्या हस्ते पुजा होऊन मिरवणुकीने जुनी फौजदार चावडी जवळ येऊन थांबली. येथे पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधून दोन ते सात नंदीध्वजास बाशिंग बांधण्यात आले. नंदीध्वजाची पुजा झाल्यानंतर पहिले नंदीध्वज उचलून नेणारे मास्तर यांना मानाचा हार घालण्यात आला. सध्या नागपुणी नंदीध्वजाचे मानकरी सोमनाथ मेंगाणे यांच्याकडू असून त्यांनी सकाळपासून उपसास करुन तो नंदीध्वज एकटय़ाने होम मैदानापर्यंत आणतात.

होममैदानावर नंदीध्वज आल्यानंतर हिरेहब्बु होमकुंडात उतरतात. तेथे बाजरीच्या पेंडीचे तयार केलेल्या कुंभार कन्येस शालु नेसुन सौभाग्यालंकार घालून सजवतात त्यानंतर त्याची विधीवत पुजा करुन त्या कुंभार कन्येस हिरेहब्बु अग्नी देतात. तेथील विडय़ाचा मान कुंभार यांना दिला जातो. हिरेहब्बु पालखी व नंदीध्वज होमास पाच प्रदक्षिणा घालतात. तिळगुळाचा कार्यक्रम होऊन नंदीध्वज भगिनी समाजाजवळ येऊन थांबवतात व नंदीध्वज होमास पाच प्रदक्षिणा घालतात. यावेळी तिळगुळाचा कार्यक्रम झाला.

रात्री उशिरा भाकणूक

होम पार पडल्यानंतर नंदीध्वज मंदिराजवळ आणले जातात. त्या नंतर फडकुले सभागृहात बाहेर देशमुखांचे वासरु आणुन त्याची भाकणूक पार पडली. ते वासरु हिरेहब्बुंकडे स्वाधीन करुन धान्य व सर्व प्रकारचे विडा सामान ठेवले जाते. ज्या वस्तुंच्या वासराचा स्पर्श केला त्यावरुन त्यांचे बाजारमुल्य ठरवले जाते.

यावेळी ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. रितेश थोबडे, शिवानंद हिरेहब्बु, मनोज हिरेहब्बु, जगदिश हिरेहब्बु, विनोद हिरेहब्बु, प्रदीप हिरेहब्बु, संतोष हिरेहब्बु, धनेश हिरेहब्बु, विकास हिरेहब्बु, संजय हिरेहब्बु, सागर हिरेहब्बु, मानकरी तम्मा मसरे, सुधीर थोबडे, योगीनाथ कुर्ले, अशोक वाले, सुरेश म्हमाणे, गंगाधर कल्याणकर, सचिन बर्हिरोपाटील, शिव सौन्ना, राजशेखर पाटील, राजशेखर चडचणकर, बाळासाहेब मुस्तारे, बाबुराव दर्गोपाटील, असिम सिंदगी, बिपीन धुम्मा, योगिराज कुंभार, मल्लिकार्जुन कुंभार, सुरेश कुंभर, रेवणसिध्द कुंभार, चंद्रकांत कुंभार, योगेश इटाणे, तम्मा कल्याणशेट्टी, राजू वाले, श्रीशैल पाश्चापूरे, योगेश कल्लूरकर आदी उपस्थित होते.

 

Related posts: