|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लेखकाला व्रतस्थ आयुष्य जगता आल पाहिजे-पानीपतकार विश्वास पाटील

लेखकाला व्रतस्थ आयुष्य जगता आल पाहिजे-पानीपतकार विश्वास पाटील 

प्रतिनिधी/ पलूस

कृष्णाकाठाच्या मातीने सर्वात मोठे लेखक, शाहीर, कलाकार दिले. मराठी साहित्यात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न लेखकाने केला पाहिजे. लेखक हा व्रतस्थ असतो, त्याला व्रतस्थ आयुष्य जगता आले पाहिजे. लेखकाने एक पुस्तक लिहून पुरस्कार घेवून थांबून चालणार नाही. वाचकांनी साहित्यातून माणूस शोधून पाठपुरावा करावा. नव लेखकांनी घसघशीत घवघवती लिहले तर वाचक डोक्यावर घेतील. मराठी भाषेतील शब्द मऊ, मृदू आहेत तितकेच कडक, पाशाणासारखे कठीण आहेत. आज सिमेवर अनेक जवान शहीद होत आहेत. त्यांना श्रध्दांजली देण्यासाठी मराठी माणसं एकवटतात. हिच मराठी वित्ती जपली पाहिजे. असे प्रतिपादन पानिपतकार विश्वास पाटील यांनी औदंबर येथील 74 साहित्यसंमेलनात व्यक्त केले. सदानंद साहित्य मंडळ औंदुबर संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

    ते पुढे म्हणाले, साहित्यिकाच्या जीवनामध्ये ठिणगी पडते व साहित्याचा वणवा पेटला तरच ते साहित्य दर्जेदार होवून त्याला लोकमान्यता मिळते. लेखक हा लेखक नसून तो कलावंत असला पहिजे. साहित्यिकाने गर्व न बाळगता अखंडपणे लिहले पाहिजे. सध्या त्यामध्ये खंड पडला आहे. एक कादंबरी प्रसिध्द झाली त्याला पुरस्कार मिळला की, साहित्यिक थांबतो आहे.  अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. मराठी साहित्यात अनेक प्रश्न आहेत ते पुढे नेण्यासाठी साहित्यिकांनी समर्थपणे असले पाहिजे, महाराष्ट्रामध्ये थोर साहित्यिकांची परंपरा आहे. म्हणजेच महाराष्ट्राची माती कसदार आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर आहे. साहित्यामध्ये खऱया अर्थाने विर्दभात अनुषेश आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्राने भरून काढला आहे. लेखकाने स्वतःचे व्यक्तीमत्व रेखाटले पाहिजे. झोकून देवून लिहले पाहिजे.

   ग्रामीण भागातील साहित्यिकांनी वेगवेगळे विषय आपल्या लेखनात आणले पाहिजे. ग्रामीण भागात वास्तववादी लिखाण दडलं आहे. ते लेखेकांनी हातळावं,  सध्या सर्वत्र नागरीकण वाढत चालले आहे. नागरीकरणावर लेखकांनी लिहले पाहिजे. जातीपातीवर लिहले तर लोकांना आवडते असे नाही ते पुढे घातक ठरू शकते. हे लेखकांनी कलावंतांनी मान्य करावे. पानीपत कादंबरी लिहताना मला किती वेळ लागला हा प्रश्न लोक विचारतात. मुर्तीकार जेव्हा मुर्ती घडवतो तेव्हा तो पाशाणावर किती घाव घातले हे मोजतो का अशा शब्दात पाटील यांनी उत्तर दिले.

  संमेलनाच्या प्रारंभी आपले विचार मांडण्याठी विश्वास पाटील उभा राहिले त्यावेळी ते म्हणाले, माझे आडनाव पाटील आहे पाटील आडनाव साहित्यात शोभत नाही कारण पाटील म्हटले की, पूर्वीची पाटीलकी समोर येते. तमाशाचा फड समोर दिसतो त्यापैकीच मी शब्दाच्या फडातला पाटील आहे. असे म्हणनताच उपस्थितांनी टाळया वाजवल्या. चित्रपटा विषयी बोलताना त्यांनी सैराट व बाजीराव मस्तानी या चित्रटांचा खरपूस समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, पैलावाना सारखा साहित्यकाने वाचनाचा खुराख घेतला पाहिजे. जगात वेगळ आहे तिकडे कलावंताचे मन धावले पाहिजे. क्रांतीवर नाना पाटील यांच्यावर कादंबरी लिहा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. संमेलनात कवी प्रदिप पाटील यांनी पानीपतकार विश्वास पाटील यांची ओळख करून दिली.

   यावेळी मान्यवरांच्या हस्ते मोहन औटे यांच्या खुन्नस पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते सन 2015 चा सुधांशु पुरस्कार राजेंद्र टिळे (शिराळा) सुरेश कुलकर्णी, ओंकार चिटणीस (बोरगाव), प्रा. विठ्ठल सदामते (आमणापूर) यांना देण्यात आला. शहानवाज मुल्ला (इस्लामपूर) यांना देण्यात आला. या साहित्य संमेलनासाठी सरपंच संजना यादव, उपसरपंच विजय पाटील, बापूसाहेब शिरगांवकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उदयसिंह सुर्यवंशी, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष प्रकाश पवार, अशोक पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक शाहजी सुर्यवंशी तर पुरूषोत्तम जोशी यांनी आभार मानले.

           पुरंदरविमान तळास संभाजी महाराजाचे नाव

  विश्वास पाटील म्हणाले, पुरंदर येथे विमानतळ करण्याचे काम माझ्याकडे सोपवले आहे. त्याआधी मी त्यांना या विमानतळास संभाजी महाराज यांचे नाव देण्याचे सांगितले यावर मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केले आहे.

 

Related posts: