|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अफलातून काव्यरचनांनी उपस्थित श्रोते झाले मंत्रमुग्ध

अफलातून काव्यरचनांनी उपस्थित श्रोते झाले मंत्रमुग्ध 

प्रतिनिधी/ डॉ. आनंद यादव नगरी

संस्कार देणारे ही पुस्तकं असतात. बोलण्या वागण्यासारखे बदल हे पुस्तकातूनही घडून येतात. प्रत्येक पुस्तक हे देव आहे. ग्रंथांनी आम्हाला मनुष्य प्राण्यापासून मानव केलं. सगळय़ा प्राणीमात्रामध्ये मणुष्यप्राणी हा क्रूर. त्या माणसाला सुसंस्कारित हे वाङमयांने बनवलं. साताऱयाचा हा ग्रंथमहोत्सव ही वाङमयांची जत्रा आहे. ही संस्काराची जत्रा आहे. वळण नेहमी सरळच लागण्यासाठी असते. ते लावण्याचे काम हे ग्रंथ करत असतात. साताऱयात ग्रंथमहोत्सवात ग्रंथांची पूजा केली जाते, अशी शब्दरुपी स्तुतीसुमने ज्येष्ठ साहित्यिक ऍड. भास्करराव आव्हाड यांनी उधळली.

ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ऍड. भास्करराव आव्हाड बोलत होते. प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, प्रदीप कांबळे, शिरीष चिटणीस, वि. ना. लांडगे, प्रा. साहेबराव होळ, सुनिताराजे पवार, नंदा जाधव आदी उपस्थित होते.

भास्करराव आव्हाड म्हणाले, माणूस दहा लाख वर्षापूर्वी बोलायला लागला. तेव्हापासून संस्कृती आहे. लेखकाला काही जाणवते ते तो ते लिहित असतो. 9 हजार वर्षापूर्वीपासून माणूस लिहायला लागला. ऋग्वेदापूर्वीच लिखाण माहित नाही. परंतु त्यानंतर लिखाण वाढत राहिली. ते लिखाण इतरांना घडवू शकतं. पुस्तक म्हणजे केवळ पानं नसतात. त्यामध्ये विचारमंथन असतो. ते पुस्तक युगांमध्ये झालेली वैचारिक क्रांती असते तो ग्रंथ असतो. याच साहित्यातून माणसं घडतात. संत ज्ञानेश्वर, तुकाराम या संतांनी स्वतःला आलेले अनुभव विचार स्वतः लिहिता लिहिता समाजासाठीही लिहून गेले. या मानव जातीतील पुढची पिढी ही खुप हुशार आहे. त्या पिढीला संस्कारीत करणारे हे ग्रंथ असून ते मागची पिढी आयते लिखान देते. ज्ञानाला जगात कोणतीही भाषा नसते. ते विकता आलं पाहिजे. जगाला त्या ज्ञानाच्या जोरावर वाकवता आलं पाहिजे. धर्म ही व्यक्तिगत गोष्ट आहे. धर्म हा वेगळा विषय आहे. तत्वज्ञान हे वेगळी बाब आहे. पुस्तकातून विचार घेता येतात. ग्रंथ हे ज्ञानाचे भांडार आहे. तिजोऱयांना मोठीं कुलूपे लावतो. परंतु ग्रंथांना कुलूप नसते. ग्रंथाशिवाय गुरु कोण नसतं. प्रत्येकाला असा गुरु भेटू शकत नाही. ज्ञान आणि संस्कार या दोन्ही गोष्टी वेगळय़ा आहेत. शहाणपण उपजत येते. ज्ञान हे बाहेरुन येतं. पण चारित्र्य घडवावं लागत. आजकाल ज्ञान खूप झाल आहे. जेव्हा ज्ञानाची आणि चारित्र्याची फारकत होते तेव्हा विध्वंस होतो, असे मत त्यांनी मांडले.

प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, आपल्यातील संत साहित्यांचे कार्य मोठं आहे. या साहित्याचा वेगळा पायंडा महाराष्ट्राने दिला आहे. त्यातूनच नाथ सांप्रदाय, भक्ती सांप्रदाय जन्माला आला. माणसाला माणूस म्हणून जागा ठेवण्याचे काम या ग्रंथांनी केलं. वारकरी सांप्रदायाला एक आचारसंहिता ठरवून दिली आहे. सावता माळी ज्या प्रमाणे म्हणायचे कांदा मूळा भाजी अवघी विठाई माझी, संत गोरा कुंभारही अभंगाच्या तालात नामस्मरणात लिन व्हायचे. ब्रिटीशांनी दीडशे वर्ष राज्य केलं तर मोघलांनी तीनशे वर्ष राज्य केलं. या निद्रीस्त महाराष्ट्राला जाग करण्याचे काम ग्रंथांनी केलं. राम जोशीसारख्या समाजधुरिणांनी केलं. शांत रस, भक्ती रस, वीर रस तयार केला. महाराष्ट्रात तत्व जागे करणारे लेखक तयार झाले. सौंदर्यवादावर वाड्मःय तयार झाले. तेच कार्य सातारचा ग्रंथ महोत्सव करत आहे. वाचन संस्कृती वाढवण्याचे आणि रुजवण्याचे काम करत आहे, असे मत त्यांनी मांडले.

प्राचार्य यशवंत पाटणे यांनी आपले मत मांडले. शिरिष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन सुनिता कदम यांनी केले. यावेळी ल.गो.जाधव, प्रमोदिनी मंडपे, दीपक भुजबळ, युवराज पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्याही विचाराने वातावरण आणखी फुलले

शब्दांचे व्यासपीठ, लेखक घडवणारे व्यासपीठ म्हणून ग्रंथमहोत्सवाकडे पाहिले जाते. याच व्यासपीठावरुन वक्त्यांना ऐकण्यासाठी सातारकरांची उत्सुकता लागून राहिलेली असते. तसाच प्रकार प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्याही बाबती. ते बोलायला उठले आणि जगणं आणि लिहणं, साहित्यसंबंध कसा आहे. पुस्तकात रमणारा प्रदेश हा ग्रंथमहोत्सव आहे. पुस्तक रडतात देखील आणि पुस्तके जगण्याची उर्मीही देतात, असे सांगून एका जवानांची कथा त्यांनी सांगितली आणि वातावरणच आणखी त्यांनी फुलवून टाकले.

 

Related posts: