|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकणासाठी ‘नाम’चा विकास आराखडा

कोकणासाठी ‘नाम’चा विकास आराखडा 

चिपळूण

सहय़ादी पर्वतावर पडणाऱया पावसाचे पाणी नदीनाल्यामार्फत समुद्राला मिळते. त्यासाठी सहय़ादीवरच पॅनाल तयार करून ते पाणी पॅनालद्वारे पश्चिम महाराष्ट्रात नेल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱयांना मोठा दिलासा मिळेल. या पावसाच्या पाण्याचा उपयोग कोकणासह पश्चिम महाराष्ट्रालाही होईल. यासाठी जवळपास 35 हजार कोटी रुपयांची गरज आहे. याबाबतचा आराखडाही तयार करण्यात आला असल्याची माहिती नाम संस्थेचे प्रतिनिधी राजाभाऊ शेळके, गणेश थोरात व समीर जानवलकर यांनी दिली.

येथे सुरू असलेल्या जलसाहित्य संमेलनात नाम संस्थेचा आतापर्यंतचा प्रवास उलगडताना ते पुढे म्हणाले, कोकणातील शेतकऱयांपुढे मोठय़ा समस्या नसल्या तरी खाडीलगत असणाऱया शेतजमिनीत या खाडीचे खारे पाणी जावून शेती नापीक झाली आहे. या समस्याग्रस्त शेतकऱयांसाठी नाम आता कोकणावर लक्ष पेंद्रीत करणार आहे.

इतरांना सल्ला देण्यापेक्षा आपणहून स्वत: पुढाकार घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबाला मदतीचा हात देत त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना स्वहक्काचे जीवन जगता यावे आणि त्यांचे खचलेले त्यांचे आयुष्य पुन्हा उभे रहावे या सामाजिक जाणिवेतून नाम संस्था काम करत आहे. एकूणच आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या पुटुंबांचे अश्रू पुसण्याचे काम नाम संस्था करत असून यातूनच या संस्थेने एक माणूसकीची चळवळ उभी केली आहे.

नाम संस्थेचे सदस्य प्रत्येक गावागावात तयार झाले आहेत. तरुणवर्ग इतका जोडला गेला आहे की, त्यांना कोणते काम द्यावे, असा एक प्रश्न पडला आहे. त्यामुळे या वर्गासाठी कृषीमित्र तयार करून शेतकऱयांच्या समस्या सोडवण्यासाठी ते काम करणार आहेत. महिला सक्षमीकरणासाठी व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठीही नाम संस्था काम करत आहे. 75 टक्के सावकार शेतकऱयाची पिळवणूक करीत असल्यामुळे शेतकऱयांपुढे आत्महत्या हे एकच मुख्य कारण आहे. मात्र या सावकाराना कायदा शिकवायचा म्हटल्यास पुरावेच नसल्यामुळे ते अशक्य होत असल्याने सावकारांचे फावले आहे. त्यासाठी कायद्यात बदल करायला हवेत असेही ते म्हणाले.