|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » महादेव नाईक यांचा कोडार भागात प्रचार

महादेव नाईक यांचा कोडार भागात प्रचार 

वार्ताहर/ दाभाळ

विद्यमान सरकारने राज्यातील गावागावामध्ये विकास पोचविला असून सर्वसामान्य लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. सर्वसामान्याचे हित जपणे हा या सरकारचा मुख्य उद्देश असून तो साध्य करण्यासाठी शिरोडय़ातून पुन्हा एकदा भाजपला विजयी करा, असे आवाहन आमदार तथा उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी केले.

कोडार येथे आयोजित प्रचार फेरीत ते बोलत होते. यावेळी सरपंच पूनम सामंत, उपसरपंच दुर्गाप्रसाद वैद्य, पंचसदस्य चंद्रकांत सामंत, ज्योती गावडे, राजेंद्र नाईक, शिरोडा भाजप मंडळाचे अध्यक्ष सूरज नाईक, युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य कपिल बोरकर, मोहनदास गांवकर, परेश नाईक, मंगलदास नाईक, एकनाथ नाईक, अर्चना नाईक, तुळशी नाईक, बागी कुळेकर, किरण सावंत, सुलक्षा गांवकर, लक्ष्मी झोरे, सविता गांवकर, साईश्री गांवकर, सुनिता गांवकर, मीना कोडारकर तसेच अन्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

कोडार येथील श्री सोमनाथ देवस्थानात देवदर्शन घेऊन नाईक यांनी प्रचार फेरीला सुरुवात केली. मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला.