|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » खूनी नराधमास 23 पर्यंत पोलीस कोठडी

खूनी नराधमास 23 पर्यंत पोलीस कोठडी 

वार्ताहर/ भिलवडी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खून केलेल्या नराधमास 23 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आरोपीची वसंतदादा रुग्णालय, सांगली येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

माळवाडी-भिलवडी ता. पलूस येथील शाळकरी अल्पवयीन मुलीवर तिचा पाठलाग करुन संशयित आरोपी प्रशांत उर्फ हिमेश राजाराम सोंगटे, माळवाडी याने अत्याचार करुन तिचा खून केल्याची कबूली दिली. या आरोपीस सांगली न्यायालयान हजर केले असता, 23 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 5 जानेवारी रोजी पिडीत मुलगी घराबाहेर पडली असता ती मेन रोडवरुन जात असताना मद्यधुंद अवस्थेत असणाऱया सोंगटे याने तिचा पाठलाग करुन तिच्यावर अत्याचार केला व पुरावे नष्ट करण्याच्या हेतुने तिचा खून केला, अशी कबूली आरोपीने पोलिसांना दिली आहे.

मात्र सदर घटनेत एकापेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता आहे. कारण, आरोपी प्रशांत सोंगटे याने अन्य दोन साथिदारांच्या मदतीने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. असा अंदाज व्यक्त होतो आहे. मात्र घटना घडलेल्या 5 जानेवारीनंतर आजतागायत प्रचंड पोलीस यंत्रणा राबवूनही पोलिसांना एकच आरोपी पकडण्यात यश आले आहे. या गुह्याविषयी अधिक माहिती व अन्य आरोपी याविषयी अद्यापही गोपनियता ठेवण्यात आली आहे. अद्यापही पोलीस यंत्रणा या गुह्यातील अन्य आरोपींचा तपास करत आहेत.

या गुह्यातील सर्व आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी भिलवडी परिसरासह नागरिकांतून होत आहे.

चौकट-

या भागात खंडोबाचीवाडी, जुन्या तासगाव रोड लगत एका मळय़ात शंकर वारे व त्यांचा मुलगा रणजीत वारे यांचा निर्घृण खून झाला होता. या घटनेला 3 वर्षे झाली तरी या खुनातील आरोपी अद्याप सापडला नाही. तर, या खुनाच्या तपासाचे काय झाले? का फाईल बंद झाली? याबाबत सदर घटनेवरुन परिसरात चर्चा रंगू लागली आहे.

Related posts: