|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पंढरीत वाळूवर कारवाई : 4 जेसीबी 11 बोटी 23 वाहने जप्त

पंढरीत वाळूवर कारवाई : 4 जेसीबी 11 बोटी 23 वाहने जप्त 

पंढरपूर / प्रतिनिधी

तालुक्यतील आंबे येथे आज सायंकाळी येथील प्रांताधिकारी डॉ विजय देशमुख आणि सहाय्यक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या संयुक्त पथकांने अवैध वाळू उपश्यावर सर्वात मोठी कारवाई केली असल्यांचे समजते आहे. यामधे सुमारे 4 जेसीबी , 11 बोटी आणि 23 वाहने देखिल जप्त केले असल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र सदरची कारवाई रात्री उशीरापर्यत सुरू होती.

  पंढरपूर तालुक्यातील भीमा नदींच्या काठावरून मोठया प्रमाणावर वाळूचा उपसा हा होत असतो. यामधे येथील चळे , आंबे या गावामधून मोठया प्रमाणावर अधिकृत आणि अनाधिकृत वाळूचे ठेके आहेत. सध्या आंबे येथे येथील महसुली खात्यंच्या परवानगीनुसार सुरू असणारे दोन वाळू पॉइंट आणि ठेके आहेत. मात्र याच वाळू ठेक्यंच्या शेजारी सध्या अ†िधकृत ठेका असल्यांचे सांगत काही वाळूमाफ्ढिया हे अनाधिकृतपणे यांत्रिकी बोटींच्या सहाय्याने वाळूचा ठेका हा चालवित होते.

  याबाबत येथील प्रांताधिकारी डॉ विजय देशमुख यांनी सहाय्यक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मदतीने आज रविवारच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास मोठया प्रमाणावर कारवाईचे अस्त्र उगारले. यामधे प्रांताधिकारी डॉ देशमुख यांनी पोलिसांसह संध्याकाळी अचानक आंबे या गावामधे छापा टाकला. यावेळी सदरची कारवाईही करण्यात आली. यामधे संध्याकाळी सहा वाजलेपासून रात्री उशीरापर्यत महसुली पथकांची वाळूवर कारवाई सुरू असल्यांचेच समजत होते. 

आजच्या कारवाईमधे जेसीबीसह 27 वाहने आणि 11 यांत्रिकी बोटी हया बेकायदेशीर अधिकृत ठेका असल्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या वाळू उपश्यांच्या केंद्रावर आढळून आले असून याशिवाय शेकडो ब्रास वाळू देखिल याठिकाणी उपसा केलेली आणि साठवणूक केलेली आढळली असल्यांची माहीती ही सायांकळी आठच्या सुमारास महसुली सुत्रांकडून मिळाली आहे.

  मात्र या कारवाईमधे साधारणपणे 100 हून अधिक वाहने सदरच्या कारवाईमधे दिसून आल्यांचे आंबे गावातील उपस्थितांचे म्हणणे आहे. शिवाय याबाबत सायंकाळनंतर सोशल मिडीयांवरही वेगवेगळया प्रकारचे संदेश फ्ढाŸरवर्डेड होत होते. तरी सदरच्या कारवाईमधे नक्की किती वाहने सापडली आणि यामधून किती ब्रास वाळू ही जमा केली. याबाबत अधिकृतपणे कुठल्याही शासकीय अधिका-यांकडून समजू शकत नव्हते. कारण रात्री उशीरापयंत सदरची कारवाई ही सुरूच होती. मात्र यामधून मोठी आकडेवारी बाहेर येउ शकते असा अंदाज यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.

Related posts: