|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » प्रत्येक मुलाची आई कवी असते- प्रा. कवी संतोष काळे

प्रत्येक मुलाची आई कवी असते- प्रा. कवी संतोष काळे 

कृष्णा नदीच्या तिरावर सजली कवितांची मैफल : पन्नासहून अधिक कवींची उपस्थिती

प्रतिनिधी/ पलूस

प्रत्येक आईचा मुलगा कवी नसतो पण प्रत्येक मुलाची आई कवी असते. कागदावर आत्मअविष्कार उतरविण्याची सवय लावा. कवीची अनुभवांची खोली जितकी अधिक तितकी कविता संपन्न होते. असे मत औदुंबर साहित्य संमेलनातील कवी संमोलनाचे अध्यक्ष कवी प्रा. संतोष काळे यांनी व्यक्त केले.

   औदुंबर येथील सदानंद साहित्य मंडळाच्या वतीने आयोजीत 74 व्या साहित्य संमोलनांतर्गत प्रा. संतोष कोळी यांच्या अध्यक्षतेखाली पन्नास हून अधिक प्रतितयश व नवोदित कवी सहभागी झाले होते. ते म्हणाले, नवी पिढी मोठया प्रमाणावर वाचती आणि लिहती झाली आहे. या दशकात चांगलं दर्जेदार मराठी साहित्य जोमदारपणे मरगळ झटकत पुढे येत आहे. चंगळवादी संस्कृतिला फाटा देवून वाचन संस्कृतिकडे वळले पाहिजे. पु.लं. चा छत्र्यांचा चिवडा वाचून कुणी आत्महत्येपासून परावृत्त होत असेल तर त्यावरून साहित्यातील चैतन्यांची प्रचिती येते. साहित्य जगण्याची उभारी देते. प्रत्येक माणसाच्या घरात तळघर असते. तळघरात भावनांची घुसळण होवून अवस्थेतून कविता निर्माण होते. चांगलं लिहायचं तर चांगल्या वाचन चिंतनाची गरज आहे. असे सांगत प्रा. काळे यांनी सोनेरी दिवसाचा एक होता काळ या जागतिकीकरणात भरडणाऱया गावाचे संदर्भ टिपणाऱया कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.

     कुठला आलाय चंद्र, अन् कुठल्या आल्यात चांदण्या, रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्टया…. या कौटुंबिक नात्यातील जिव्हाळा विनोदी विडंबनाच्या अंगाने टिपणाऱया सुनील जवंजाळ यांच्या कवितेने संमेलनाची खुमासदार सुरूवात झाली.  कष्टाची भाकर सुखाचा सागर कधीही बाजार मांडू नये… असे सांगणारी कवी सुभाष कवडे यांनी माणूस नावाची उपदेशपर कविता सादर केली. सुरूंग लावून त्यांनी केलाय तिचाच गर्भपात त्यांची हापापली बोट फिरतेय तिच्या अंगावर खणतेय काळ सोनं तिच्या गर्भातून…ही संदीप नाझरे यांची नदीप्रदुषण, वाळू उपशाने उदवस्त होणाऱया आजच्या कृष्णाकाठच विदारक चित्रण करणारी कविता होती. तर कवी ज्ञानेश्वर कोळी आपल्या कवितेतून कृष्णाकाठची महती सांगताना म्हणाले, गांव गडया अंकलखोप माझ्या कृष्णेच्या काठाचा सधनशा गावामध्ये प्रेम भरतं मायेच…. या कवितेतून कवी ज्ञानेश्वर कोळी यांनी कृष्णा काठच धर्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक वैभव उभा केले.

   संमेलनात कवी नामदेव जाधव (बळीराजा), भानुदास आंबी (शेतकरी) वसंत पाटील (माती), अशोक पवार (मोदी), उत्तमराव चव्हाण (अनुदान), या कवींनी आपल्या कवितेतून शेत आणि शेतकार्याच्या व्यथा वेदना मांडल्या. सत्येंद्र कामत (नोटबंदी), राम सुतार (वाघ सहय़ाद्रीचा), चंद्रकांत देशमुखे (देश), दिपक स्वामी (प्रश्न), विठ्ठल सदामते, हरीभाऊ पुदाले, वासंती मेरू यांनीही आपल्या बहारदार कवितांचे सादरीकरण केले. तर विश्वनाथ गायकवाड आणि चंद्रकांत वेल्हाळ यांनी सादर केलेल्या गजलांवर रसिकांनी मंत्रमुग्ध झाले. कविसंमेलनाचे सुत्रसंचालन सुभाष कवडे, प्रदिप पाटील, रघुराज मेटकरी यांनी केले.

 

Related posts: