|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयात मुथा आर्केडला आग, 50 लाखांचे नुकसान

साताऱयात मुथा आर्केडला आग, 50 लाखांचे नुकसान 

प्रतिनिधी/ सातारा

येथील मोतीचौकातील मुथा आर्केडमधील रुपस्वामिनी या कपडय़ाच्या दुकानाला रविवारी पहाटे आग लागली. ही आग लागल्याने सकाळी 7 वाजता धुराचे लोळ बाहेर येवू लागल्यावर समजले त्यानंतर नगरपालिकेची अग्नीशामक दलाची गाडी बोलावून देखील आग नियंत्रणात येत नव्हती. अखेर कुपर कारखान्याची अद्यावत अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. मास्क घालून आलेले कर्मचारी या दुकानात घुसले दोन बाजूच्या भिंती फोडल्यानंतर दुपारी 1 वाजता आग नियंत्रणात आली तोपर्यंत रुपस्वामिनी दुकान जळून खाक झाले होते. तर या दुकानाच्या शेजारील अन्य 20 दुकानांमध्ये धुराचे लोट घुसून सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले. आग कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

राजपथावरील मोती चौकात मुथा आर्केडमधील बेसमेंटला असलेले रुपस्वामिनी लेडीज ड्रेसमटेरियल दुकान एक वर्षापुर्वी रुपाली निकम व विजय निकम या दाम्पत्याने सुरु केले. नव्याने दुकान सुरु केल्याने व प्रतिसाद ही चांगला मिळत असल्याने मोठय़ा प्रमाणावर साडय़ा, ड्रेस मटेरियल व इतर साहित्य दुकानात भरलेले होते. शुक्रवारी रात्री 9 वाजता नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद केले व घरी गेले. शनिवारी दुकानाला सुट्टी असल्यामुळे हे दाम्पत्य दुकानाकडे फिरकले नाही. रविवारी सकाळी सात वाजता त्यांना फोन आला व दुकानातून धुर येवू लागला आहे. त्वरित या असे सांगण्यात आले.

तसेच तेथील अन्य दुकानदारांना ही या आगीची माहिती मिळताच सर्वजण धावत पळत मुथा आर्केड येथे पोहचले. तोपर्यंत नगरसेवकांनाही ही माहिती मिळताच नगरसेवक वसंत लेवे, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले, सुहासराजे शिर्के, कल्याण राक्षे, धनंजय जांभळे मंडळी ही लगभगीने हजर झाली.

नगरपालिकेची अग्नीशामक दलाची गाडी येवूनही आग आटोक्यात न आल्याने अखेर कुपर कारखान्याची अद्यावत अग्नीशामक दलाची गाडी व गाडीवरील प्रशिक्षित कामगारांना पाचारण करण्यात आले. त्यांनी दुपारी 1 वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आणली. या आगीमुळे धुराचे लोट बाहेर काढण्यासाठी दुकानाच्या दोन भिंती फोडण्यात आल्या त्यामुळे या इमारतीमधून धूर बाहेर पडण्यास बराच वेळ लागला यामुळे शेजारील सुमारे वीस दुकानांच्या भिंतीवर काजळी पडली सर्व भिंती काळसर झाल्या तर या शेजारील दुकानांमधील कपडयावरही धुरांची काजळी पडल्याने या दुकांनांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले.

 

Related posts: