मुंबईत राष्ट्रवादीशी आघाडी अशक्य : काँगेस

ऑनलाईन टीम/ मुंबई :
आगामी महानगरपलिका निवडणुकीसाठी सगळेच पक्ष तयारीला लागले असून, एकीकडे भाजप-शिवसेनेत युतीबाबत चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मुंबईत राष्ट्रवादीशी आघाडी न करण्याचा निर्णय काँग्रसने घेतला आहे.
मुंबईत काँग्रेस पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणदेखील उपस्थित होते. मुंबईत होणाऱया महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीशी आघाडी होणार नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीने आधीच उमेदवार जाहीर केल्यानेच हा निर्णय घ्यावा लागल्याची पुस्तीही त्यांनी जोडली आहे.दरम्यान, इतर निवडणुकींसाठी आघाडी होणे शक्य असल्याचेदेखील संकेत चव्हाण यांनी दिले आहेत.