|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » साहित्य महामंडळाच्या निधी संकलनासाठी उदासीनता

साहित्य महामंडळाच्या निधी संकलनासाठी उदासीनता 

मुंबई / प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यासाठी आर्थिक सहकार्य मागण्याची सुरुवात गेल्या वर्षी सोशल मीडियाद्वारे संदेश पाठवून महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी केली होती. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सुमारे 1 लाख 68 हजारांची भर महामंडळाच्या खात्यात जमा झाली. मात्र हा प्रतिसाद 12 कोटींच्या मराठी भाषिक समाजाच्यासंदर्भात अत्यल्प आहे, अशी खंत जोशी यांनी व्यक्त केली.

विद्यार्थी, शिक्षक यांच्याकडून अनुक्रमे प्रत्येकी किमान एक आणि दहा रुपये गोळा करण्याच्या प्रयोगाला प्रतिसाद लाभत असला तरी त्याबाबतची उदासीनताही मोठी आहे. काही प्राचार्य आणि विद्यापीठांचे कुलगुरू यांना धाडलेल्या केवळ आर्थिकच नव्हे तर कार्यक्रमविषयक सहकार्याच्या पत्रांची साधी पोचही देण्याचे सौजन्य आपल्या समाजात उरलेले नाही, हा संशोधनाचा विषय आहे. माध्यम मालक आणि संपादकांना धाडलेल्या पत्रांबाबतही स्थिती वेगळी नाही. ज्या घटकांनी याबाबत अग्रेसर असायला हवे त्यांचीच ही स्थिती असेल तर हे व्यापक कार्य करण्यासाठी कोणाकडे आशेने बघायचे याचा विचार सर्वांनी मिळून करणे आवश्यक आहे. केवळ सरकारच्या भरवशावर ते सोडले जाऊ नये, अशी निराशा जोशी यांनी व्यक्त केली.

फुलाची पाकळी नव्हे फुलच द्यावे ही विनंती, असे आवाहन नववर्षाची सुरुवात म्हणून श्रीपाद जोशी यांनी पुन्हा केले आहे.  रोख रक्कम,  धनादेश अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नावे द्वारा विदर्भ साहित्य संघ, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर 440012 या पत्त्यावर पाठवावे. किंवा खाते क्रमांक  074410025539, आएफएससी क्रमांक BKDN 520523, देना बँक, धर्मपीठ शाखा, नागपूर येथे थेट जमा करावे.

Related posts: