|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘जय मुंबई पोलीस’ नाटय़प्रयोग सादर

‘जय मुंबई पोलीस’ नाटय़प्रयोग सादर 

जोगेश्वरी / प्रतिनिधी

शिक्षक म्हणून गेली 23 वर्ष कार्यरत असलेले प्रमोद महाडिकसर ‘संस्कार कला मंच’तर्पे पोलिसांच्या जीवनावर आधारित 35 मिनिटांच्या ‘जय मुंबई पोलीस’ या नाटय़ाचा उद्घाटन सोहळा गफहनिर्माण तथा तंत्र व उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते दत्ताराम गोविंद वायकर सभागफह, शामनगर येथे नुकताच पार पडला. या नाटय़ाचे लेखन व दिग्दर्शन प्रमोद महाडिक यांनी केले आहे.

शालेय मुलांच्या मदतीने सकारात्मक दृष्टीकोनातून पोलिसांच्या व्यथा जीवनपटात मांडल्या आहेत. शालेय व महाविद्यालयाच्या बाल कलाकारांनी अभियानाद्वारे ‘पोलीस’ या व्यक्तिमत्वाला उचित न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस हवालदार शिवाजी पांडुरंग घाडगे यांचा कार्यक्रमात वाढदिवस साजरा करण्यात आला. ‘जय मुंबई पोलीस’ हा प्रयोग मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये कोणतेही मानधन न स्वीकारता हा प्रयोग करून पोलिसांच्या चेहऱयावर आनंद आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या नाटकात प्रामुख्याने पोलिसांचे काम, कुटुंबातील ताणतणाव, कुटुंबाला दिलेले आश्वासन, पोलिसांना सुट्टीच्या दिवशी सुद्धा राजकीय, शासकीय कार्यक्रमामुळे सुट्टी न मिळणे, आग लागणे, नैसर्गिक आपत्ती,  कोणत्याही उत्सवाला सुट्टी रद्द करणे, कुटुंब सोडून कामावर हजर राहणे अशा अनेक व्यथा यावेळी बाल कलाकारांनी नाटय़ प्रयोगाद्वारे मांडल्या.

यावेळी कार्यक्रमात राज्यमंत्री रवींद्र वायकर, गुन्हे अधीक्षक सूर्यवंशी, मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, स्थानिक नगरसेवक बाळा नर, मुंबई पोलिसांचे कुटुंब, पोलीस अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Related posts: