|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » रिपाइंच्या अन्य गटांशी युतीसाठी सेनेची रणनीती

रिपाइंच्या अन्य गटांशी युतीसाठी सेनेची रणनीती 

बहुजन समाजाची मते आपल्याकडे खेचण्याचा  शिवसेनेद्वारे प्रयत्न

उल्हासनगर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप-रिपाइं (आठवले गट) यांची जागावाटप झाल्यानंतर आता शिवसेनेनेदेखील रिपाइंच्या अन्य गटांशी युतीबाबत चर्चा सुरू केली आहे. बहुजन समाजाची मते आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शिवसेनेद्वारे केला जात असून भाजपला जशाच तसे उत्तर देण्याची रणनीती आखली जात आहे.

शिवसेना-भाजप यांच्या युतीबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेला नाही. भाजप स्वबळावर लढण्याची भाषा करत असून दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांना अजूनदेखील युती होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर अजूनही सोडवला गेला नसतानाच भाजप व रिपाइं (आठवले)ने युती जाहीर करून 12 जागा रिपाइंच्या पारडय़ात देखील दिल्या. भाजप-रिपाइंच्या या अनपेक्षित खेळीने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  भाजपमध्ये येण्यासाठी राष्ट्रवादी काँगेसचे दोन नगरसेवक वगळता अन्य 18 नगरसेवक व इच्छुक उमेदवार ओमी कलानी यांच्या नेतफत्त्वाखाली गुढघ्याला बाशिंग बांधून बसले आहे. तर भाजपच्या मदतीशिवाय आपण सत्ता स्थापन करू शकणार नाही हे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना माहित असल्यामुळे ते भाजपसोबत युती करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. तिसरीकडे स्थानिक साई पक्षही भाजप सोबत युती करण्यास इच्छुक आहे.

भाजप व रिपाइंच्या स्थानिक नेत्यांनी आमची नैसर्गिक युती असल्याचे जाहीर करून 12 जागा रिपाइंला देण्यात आल्या आहेत. हि युती जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी रिपाइंच्या अन्य गट व साई पक्षासोबत आघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी या संदर्भात म्हणाले कि रिपाइंच्या गवई गट, कवाडे गट यांच्या सोबत आमची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. तसेच साई पक्षासोबत देखील आमची चर्चा सुरू असल्याचे चौधरी यांनी सांगितले. शिवसेना व रिपाइंचे बहुसंख्य मतदार हे मराठी आहेत. मात्र, शहरात 50 टक्क्यांच्या आसपास असलेल्या सिंधी मतदारांची मते मिळविण्यासाठी साई पक्षासोबत शिवसेना युती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.

Related posts: