|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » लाखो रुपये खर्चुनही शौचालयांची दुरवस्था

लाखो रुपये खर्चुनही शौचालयांची दुरवस्था 

केंद्रीय समितीने उल्हासनगर पालिकेला फटकारले

उल्हासनगर शौचालय बांधणे आणि दुरुस्ती करण्यासाठी सरकारी निधीचा वापर करून सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. मात्र त्यांची दुरवस्था झाल्याने केंद्रीय  समितीने पालिका प्रशासनाला फटकारले असून हा मिळालेला निधी गेला कुठे, असा प्रश्न केला आहे.

केंद्रातील क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या समितीच्यावतीने प्रसाद एडेकर, सचिन संबेराव, जितेंद्र यादव, रोहित मिश्रा यांनी नुकतीच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उल्हासनगर शहराचा पाहणी दौरा केला. त्यांनी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेऊन प्रथम शहराची रोड, कचरा आदींची चित्रफीत बघिल्यावर, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांच्या सोबत शौचालयांची पाहणी केली. शहर हागणदारी मुक्तीसाठी पालिकेने कोणते उपक्रम राबवले, त्याचाही आढावा घेतला. विविध शौचालयांची पाहणी करताना, त्यात वीज-पाणी नाही, भिंतींना तडे गेलेले, ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने उघडय़ावर नालीतून वाहणारे शौच, तसेच दरवाजे नसल्याने पत्र्याचा-कापडांचा केलेला आडोसा, असे विदारक दृश्य निदर्शनास आले.

उल्हासनगर शहर स्वच्छ दिसत आहे. रोडवर, कुंडय़ात कचरा दिसत नाही, नाल्यांची अवस्था ठीक आहे. असे चित्र असताना शौचालयांच्या दुरवस्थेबाबत समितीने नाराजी व्यक्त केली. शहरात सार्वजनिक 350 आणि एमएमआरडीएने बांधलेली 160 शौचालये आहेत. त्यात पे अँड युजचे 40 शौचालये असून आणखीन 12 बांधून तयार आहेत. स्वच्छ भारत अभियानअंतर्गत 15 हजार 500 नागरिकांनी त्यांच्या घरात शौचालये बांधली आहेत. 400 शौचालये बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे, असी माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी ही माहिती दिली.

लवकरच दुरुस्तीची कामे करू : आयुक्त

या शौचालयांच्या दुरवस्थेवर ठपका ठेवल्याबाबत आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याशी विचारणा केली असता, युद्धपातळीवर शौचालयांची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार. सोबतच वीज आणि पाण्याचे कनेक्शन जोडले जाणार आहोत असे सांगितले.

Related posts: