|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बिहार, युपी पेक्षा राज्यात महिलांच्यावर अत्याचार सर्वाधिकः चित्रा वाघ

बिहार, युपी पेक्षा राज्यात महिलांच्यावर अत्याचार सर्वाधिकः चित्रा वाघ 

प्रतिनिधी/ सांगली

राज्यात महिलांच्यावर गेल्या दोन वर्षात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. देशातील सर्वात मोठय़ा युपी आणि बिहार पेक्षा राज्यात महिलांच्यावर अत्याचाराची संख्या मोठय़ाप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या मुद्यावरून राजिनामा कधीच देणे गरजेचे होता अशी टिका राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. तसेच राज्य महिला आयोग बिनकामी असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या जिल्हा दौऱयावर आल्या असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही टिका केली.

चित्रा वाघ म्हणाल्या भिलवडी येथे घडलेली घटना ही अतिशय प्रुर अशा प्रकारची आहे. कोपर्डीनंतरची ही दुसरी घटना राज्याला शरमेने मान खाली घालवण्यास लावणारी आहे. कोपर्डी येथे तीस दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले पण त्यावेळेत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री किती बेजबाबदार विधाने करतात ते समजून येते. तसेच याठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्य़ा सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यामुळे त्यानंतर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे आता तसाच प्रकार भिलवडीत घडला आहे. जलदगती न्यायालयात ही प्रकरणे चालून सहा महिन्यात आरोपींना शिक्षा लागली पाहिजे असे त्यांनी सांगितले. पण हे होत नाही कारण महिलांच्यावर अत्याचार होत असतानाही सरकार मात्र काहीच करत नाही.

राज्य महिला आयोग बिनकामी

राज्य महिला आयोग राज्यात अस्तित्वात आहे की नाही अशी शंका येते. कोणत्याही पक्षाचे सरकार येवू दे त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्याही पक्षांच्या महिला असोत त्यांनी महिलांच्यावर अत्याचार झाल्यानंतर तातडीने त्याबाबत सरकारला धारेवर धरले पाहिजे संबंधित यंत्रणेविरोधात तातडीने आदेश देवून त्या अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्याची गरज आहे. पण असे गेल्या दोन वर्षात झालेले नाही. त्यामुळे राज्य महिला आयोग पुर्णपणे बिनकामी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारची तळी उचलून धरण्याचे आणि सरकारचे प्रवक्ते होण्याचे राज्य महिला आयोगाने थांबवावे असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादीकडून अशा घटना घडू नयेत म्हणून प्रबोधन

राष्ट्रवादी पक्षांतील महिला संघटना आणि युवतींनी यापुढील काळात महिलांच्यावर अशा घटना घडू नयेत त्यासाठी कोणती दक्षता घ्यावी तसेच जर ही घटना घडली तर त्या मुलींना आणि महिलांना तातडीने पोलीस संरक्षण तसेच त्यांचा गुन्हा नोंद करून घेण्यासाठी राष्ट्रवादी महिला प्रयत्न करणार आहेत. या प्रयत्नामुळे महिला सक्षम होतील असेही त्यांनी सांगितले.

नोटाबंदीमुळे शेतकऱयांना सर्वाधिक त्रास

नोटाबंदीमुळे शेतकऱयांना सर्वाधिक त्रास झाला आहे. पण याची जाणीव सरकारला नाही अजूनही सरकार नोटाबंदीच्या निर्णयाचे ब्रँडिंग करत आहे. शेतकऱयांच्या शेतीमाल अगदी नाममात्र दराने विकण्याची वेळ आली. तसेच मजूर आणि इतर अशिक्षित महिलांची यामध्ये फसवणूक झाली. अजूनही लोक बँकांच्या रांगेत उभे आहेत त्यामुळे हा नोटाबंदीचा निर्णय जनतेच्या हिताविरोधात होता असे त्यांनी सांगितले.

महिलांसाठी 35 कायदे पण त्याच्या अंमलबजावणीचे काय ?

महिलांसाठी सध्या 35 कायदे अस्तित्वात आहेत. या कायदय़ान्वये महिलांना संरक्षण देण्यात येते किंवा तिच्यावर अत्याचार झाला तर तो करणाऱयांच्यावर कडक कारवाई करण्यात येते पण या 35 कायदय़ांची प्रभावी अशी अंमलबजावणी करण्यात येत नाही त्यामुळे महिलांच्यावर अन्याय होत आहे असे त्यांनी सांगितले.

Related posts: