|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » 2 कोटी खर्चुन उभारली जातात शौचालये

2 कोटी खर्चुन उभारली जातात शौचालये 

पंढरपूर / प्रतिनिधी

संत ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांच्यासमवेत आलेल्या लाखों वारकरी भक्तांची येथील वाखरी पालखीतळावर स्वच्छतागृहाबाबत सोय व्हावी. यासाठी सध्या प्रशासनाकडून सुमारे 2 कोटी खर्च करून 784 शौचालयांची निमिती केला जात आहे. त्यामुळे भविष्यात प्रस्तावित असलेल्या पालखीतळांच्या क्षेत्रवाढीवरील भाविकांना याचा फ्ढायदा होणार आहे.

   आळंदी , देहू याठिकाणहून गेल्या अनेक वर्षापासून संताच्या पालख्या या लाखों वारकरी भक्तांचा मेळा घेउन आषाढी यात्रेला पंढरपूरकडे येत असतात. यावेळी पंढरपूरपासून 6 किमी अंतरावर असणा-या वाखरी या गावांमधे ज्ञानोबा तुकोबांसह सर्व प्रमुख 7 सात हे एकत्र येत असतात. आणि येथेच पालखीसोहळयातील सर्वात मोठे उभे आणि गोल रिंगण हे आषाढ शुध्द एकादशींच्या पूर्वसंध्येला अर्थात दशमी दिवशी होत असते. यावेळी याठिकाणी सर्वाधिक गर्दी ही एकवटलेली दिसून येते. त्यामुळे येथे मोठया प्रमाणावर स्वच्छतागृहांचा आभाव होते.

 सद्यस्थितीला पंढरपूर नगरपरिषदेची काही शौचालये येथे उपलब्ध आहे. शिवाय येथेच शेजारी असणा-या एमआयटी या संस्थेने देखिल काही शौचालये सांडपाण्यासह भाविकांना वापरण्यास दिली आहेत. तरी देखिल साधारणपणे 6 लाखांच्या आसपास भाविक येथे एकत्र आल्यावर मोठया प्रमाणावर शौचलयसांचा प्रश्न येथे निर्माण होता.

  याशिवाय 2016 या वर्षापासून आषाढीनंतर कार्तिकीला याच ठिकाणावर मोठया प्रमाणावर जनावरांचा बाजार हा प्रशासनाकडून भरवला जातोय. यावेळीही येथे सुमारे 2 लाख भाविकांची आवक ही राहणार आहे. त्यादृष्टीने येथे शौचालये होणे हे सर्वार्थाने योग्य आहे.

सध्या पंढरपूर विकासांबाबत सरकार गंभीर आहे. शिवाय यात्राकालावधीतील स्वच्छतागृहांबाबत उच्च न्यायालयांचे काही निर्बध्द आहेत. यातूनच गेल्या दोन वर्षापासून तीर्थक्षेत्र विकास आराखडयांतर्गत पंढरपूर शहरात विविध ठिकाणी शौचालय तयार करण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे आजमितीला पंढारीत सर्वाधिक शौचलये ही उभी आहेत. याशिवाय सध्या तीर्थक्षेत्र विकास आराखडयातंर्गत आणि नव्याने होउ घातलेल्या नमामि चंद्रभागा अभियानामधून देखिल पालखीमार्गवर स्वच्छता गृह उभी केली जाणार आहे.

  यातून सध्या वाखरी पालखीतळांवर एमआयटीच्या कंपाउड भिंतीला लागून पाच ब्लॉक मधून 560 शौचालये निर्माण केली जात आहेत. तर याच पालखीतळांच्या डाव्या बाजूस दोन ब्लॉकच्या माध्यमातून 224 शौचालय उभारणीचे काम सुरू आहे. याकरिंता साधारणपणे 2 कोटी 69 लाख रूपये खर्च केले जात आहेत. सदरचे काम हे आषाढीयात्रेपूर्वी पूर्ण करण्यासंबधी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

सध्या प्रशासनाकडून सदरच्या पालखतळासमवेत येथे उपलब्ध असणारी गायरांनाची काही मोकळी जागा आणि पुनर्वसनांची शिल्लक राहीलेली जागा एकत्र करून वाखरींच्या पालखीतळांचे क्षेत्र हे वाढविण्यांचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे भविष्यात येथे स्वच्छतागृहांची मुबलकता मिळाल्यानंतर जागेचीही मुबलकता प्राप्त होणार असून या जागेवर येणा’-या भावेकांनाही या स्वच्छतागृहांचा फ्ढायदा होणार आहे. यासाठीच पालखीतळांच्या शेजारी दोन ब्लॉकमधून देखिल शौचलयांची निर्मिती केली जात आहे.

Related posts: