|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आमदार रमेश कदम यांची पुन्हा सोलापूर वारी

आमदार रमेश कदम यांची पुन्हा सोलापूर वारी 

सोलापूर / प्रतिनिधी

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या भ्रष्टाचाराप्रकरणी आमदार रमेश कदम यांनी न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केला असून, याच्या सुनावणीबाबत कदम यांना सोमवारी सोलापूरात आणण्यात आले. याबाबत न्यायालयाने आज (मंगळवारी) सुनावाणी करणार आहे.

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या भ्रष्टाचाराप्रकरणी मोहोळचे आमदार रमेश कदम यांच्यावर सोलापूरामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.  त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी रमेश कदम यांना ताब्यात घेतले होते. सोमवारी जामीन अर्ज दाखल करण्यासाठी कदम यांना पुन्हा सोलापूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने याबाबत आज सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

 रमेश कदम यांनी सुनावणी दरम्यान वकीलाची मदत न घेता स्वतःच न्यायालयात युक्तीवाद केले. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडाळात कर्ज वाटप कसे करण्यात आले? कर्ज वाटपसाठी कोणते नियम-अटी लागू आहेत? याबाबत न्यायालयात कोणतीच माहिती देण्यात आली नाही. कार खरेदीसाठी चेक एकाच्या नावाने आहे आणि कार वापरणारी व्यक्ती दुसरीच आहे. हे खरे असले तरी यामध्ये माझा कोणाताही रोल नाही. कर्जापोटी घेण्यात आलेली रक्कम मी परत करायला तयार आहे. तसेच न्यायालय जी शिक्षा देईल ते मी स्वीकारायला तयार आहे. पण या संपूर्ण घटनेमध्ये मी निर्दोष असून मला याबाबत जामीन मिळावी, असा युक्तीवाद रमेश कदम यांनी केला.

कदम यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ऐकून घेवून जामीनाबाबत निकाल राखून ठेवला असून, आज अभ्यासाअंती सुनावणी करणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कदम यांना मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Related posts: