|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » हायवेवरील 600 परिमिटरूमचे होणार स्थलांतर

हायवेवरील 600 परिमिटरूमचे होणार स्थलांतर 

संजय पवार / सोलापूर

न्यायालयाच्या आदेशानुसार हायवे पासून पाचशे मिटरच्या आतील परिमिट रूम, वाईन शॉपी, बिअरबार आणि शॉपींचे पुढील वर्षाचे नुतनीकरण  होणार नाही. त्यामुळे अशा दुकानदारांनी आपले दुकाने स्थलांतरीत करण्यात यावीत अशा आशयाच्या नोटीसा बजाविण्याची कार्यवाही राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे  परमिटरूम बिअरबार दुकानदारामधून खळबळ माजली आहे. अशी 600 हून अधिक दुकाने स्थलांतरीत होणार असून याचा सर्वाधिक फटका शहराती दुकानदारांना बसणार आहे.

हायवे पासून 500 मिटरच्या आत दारूची दुकाने असू नयेत असे आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुक्ल विभागाकडून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्हय़ात 985 परवाना धारक देशी विदेशी दारू आणि बिअरबारची दुकाने आहेत. यामध्ये वाईन शॉपी 41, बिअरबार आणि परमिटरूम 428, बिअरशॉपी 284, देशी दारूची दुकाने 124 आणि देशी विदेशी दारूची ठोक विक्री होणारी 22 दुकानांचा समावेश आहे.

हायवेपासून पाचशे मिटरच्या आतमध्ये दारू दुकाने नसावीत आणि असतील तर त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यात येऊ नये असा आदेश न्यायालयाने दिला आहे. याची अमंलबजावणी राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या जिल्हा अधिक्षक कार्यालयाने सुरू केली आहे. या कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि हायवे प्राधिकारणाकडून जिल्हय़ातील हायवे रस्यांची माहिती मागविली आहे. या माहितीच्या आधारावर हायवेरीवरील दारू दुकान चालकांना रस्त्यापासून पाचशे मिटर लांब अंतरावर दुकानाचे स्थलांतर करण्या संदर्भात मंगळवार पासून नोटीसा बजाविण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या सोलापूर अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

सोलापूर शहराला चारीबाजूनी हायवे आहे. शिवाय शहराच्या मध्यमभागातूनही हायवे गेले आहेत. यामध्ये  पुणे-हैदराबाद, सोलापूर-विजापूर, सोलापूर-औरंगाबाद आदी प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. शहरातील आणि जिल्हय़ातील बहूतांशी परमिट रूम आणि बिअरबारच दारू दुकाने ही याच मार्गावर आहेत. काही दुकाने तर हायवेच्या काही फुट अंतरावरच आहेत. अशी. पाचशे मिटरच्या आत असणारी अशी 600 हून अधिक दुकाने आणि परमिट रूमचा समावेश आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार या दुकानाचे सन 2017-17 या आर्थिक वर्षासाठी नुतनीकरण होणार नाही. शिवाय स्थलांतर न केल्यास या दुकानांना टाळे ठोकावे लागणार आहे. त्यामुळे या दारू दुकान चालकांतून कमालीची खळबळ माजली आहे.

राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या सोलापूर जिल्हा अधिक्षक कार्यालयाने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी कार्यवाही ही सुरू झाली आहे. मंगळवारपासून अशा दुकानदारांना नोटीसा बजाविण्यात येणार आहेत. त्यामुळे 500 मिटरपेक्षा आत असणाऱया दारू दुकानदारांचे चांगलीच तारांबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमची ही दुकाने आहेत. आमच्या कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतरच आम्हाला परवाना दिला आहे. त्यामुळेच आम्ही ही गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आता नव्याने आमच्यावर बंधणे लादू नका, नवीन परवाना धारकांच्यावर ही बंधणे घालावीत अशी मागणी या दुकानदारांची आहे. त्यामुळे काही दुकानदारांनी संघटीत होऊन या न्यायालयीन निर्णयाविरूध्द पुन्हा न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Related posts: