|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ग्रंथमहोत्सव न्यूयार्कवर झेंडा फडकवले

ग्रंथमहोत्सव न्यूयार्कवर झेंडा फडकवले 

ज्येष्ठ लेखक प्रा.व. बा.बोधे यांचा विश्वास, 18 व्या ग्रंथ महोत्सवाचा शानदार समारोप

प्रतिनिधी/ प्रा. आनंद यादव नगरी

इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे, पण सातारी मराठी हे नागिनीचे दूध आहे. उत्तम वाड्मःय ग्रामीण भागातून तयार होते. अलिकडच्या विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे आणि लिहिलं पाहिजे. आपलं घरं ग्रंथांनी सजलेलं हवं. नुकताच दिल्लीत ग्रंथ प्रदर्शन झालं. तेथे पेन्ग्वीन या प्रकाशकांची कोटय़वधीची उलाढाल झाली. तसाच साताराचा ग्रंथ महोत्सवाचा झेंडा दिल्लीत नव्हे तर न्यूयार्कमध्ये फडकेल, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांनी व्यक्त केला.

ग्रंथमहोत्सवाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे सिनेअभिनेते किरण माने होते. यावेळी व्यासपिठावर मसापच्या सुनिताराजे पवार, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस, प्रा. कुमूदिनी मंडपे, नंदा जाधव, सुनीता कदम असे मान्यवर उपस्थित होते.

व. बा. बोधे म्हणाले, वक्ता हा शोधावा लागत नाही. तो प्रत्येक घरात असतो. लग्नाअगोदर नवरा वक्ता असतो तर लग्नानंतर तो श्रोता बनतो, असे सांगत, चांगले साहित्य वाचत रहा. साहित्य तुम्हाला घडवेल. नोटा बंदीमुळे एका युवकाने सोशल साईटवर एक वाक्य टाकले. ते साहित्य आहे, गुणी माणसावर प्रेम करा, आपल्या आईवडिलांवर प्रेम करा, माणसे वाचायला शिका. कुठलाही माणूस वाईट नसतो, असे सांगत, त्यांनी मराठी भाषा बिघडू लागली आहे. वेगळीच भाषा आली आहे. ओठातली भाषा बदलली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

किरण माने म्हणाले, व.बा. बोधेंच्या शेजारी बसायला मिळाले यामुळे मी खूप भारावून गेलो. मी नट असलो तरीही अनेक पुस्तक वाचली आहेत. ग्रंथ महोत्सवात मी श्रोता म्हणून येत होतो. खेडेगावात लहानाचा मोठा झालो. साताऱयाची नाळ आहे. कलाकार व्हायचे म्हटल्यावर मुंबईत जोतो जातो. अनेक निर्मात्यांकडे फोटो सेशन करुन जायचे असते. मला ते चुकीचे वाटले. मी साताऱयात पुन्हा आलो. साताऱयाने मला मोठे केले. माझं करिअर हे पुस्तकामुळेच झाले. ग्रामीण कथांना मातीचा वास आहे. शंकर पाटील, व. बा. बोधे यांच्यासारख्या ग्रामीण लेखकांनी मला वेड लावलं होतं. नाटकं करत असताना मला भालचंद्र नेमाडे भेटले. कोसला वाचलं. पु.ल., व. पू. ही वाचून काढले. त्यांनी वेगळं जग माझ्यापुढे आलं. श्याम मनोहर यांच्या लिखाणाची वेगळीच शैली. त्यांनी चौकट मोडायला शिकवलं. ग्रंथ प्रदर्शन ही सरस्वतीची यात्रा आहे. या ग्रंथ महोत्सवातील ग्रंथांनी माझ्यातील अभिनय सजवला. असा एक साहित्यिक माझ्या संपर्कात आला. त्याने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. तुकाराम गाथा वाचली. स्ट्रगल काय असते ते गाथेतील अभंगाने शिकवलं. काय व्हायचे ते पक्क करा. ध्येय निश्चित करा. माझ्या सोबतीला ग्रंथ असल्याने तुमचा हा सातारचा सुपूत्र यशाची एकेक शिखरं पादाक्रंत करुन साताऱयाचे नाव उज्वल करेल, असे त्यांनी सांगितले.

Related posts: