|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राष्ट्रवादीमध्ये इच्छूकांची हाऊसफुल गर्दी

राष्ट्रवादीमध्ये इच्छूकांची हाऊसफुल गर्दी 

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिह्यात राष्ट्रवादी                        काँग्रेसकडून गेल्या चार दिवसांपूर्वी अर्ज विक्री सुरु केली होती. त्यामध्ये सुमारे 1502 जणांनी अर्ज खरेदी केले. यामधून कोटय़ावधी रुपयांचा निधी जिल्हा राष्ट्रवादीकडे पक्ष निधी म्हणून जमा झाला. सोमवारी सकाळपासूनच इच्छूकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली.

यामध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर आणि शशिकांत शिंदे हे आडवेतिडवे प्रश्न विचारुन इच्छूकांना कोंडीत पकडत होते.

उमेदवारांकडून तब्बल 1502 अर्जांची नोंद

 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येवू घातल्या आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याच ताब्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. सर्वात अगोदर अर्ज विक्री सुरुवात केली गेली. रविवारी चार वाजेपर्यंत 1502 अर्जांची विक्री झाली.

सोमवारी सकाळी इच्छूकांच्या मुलाखतीला सुरुवात झाली. गण आणि गटानुसार मुलाखती घेण्यात येत होत्या.

 विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील आणि ज्येष्ठ नेते माजी खासदार लक्ष्मणराव पाटील हे मुलाखती घेत आहे. पहिला मान फलटण तालुक्याला मिळाला होता.

त्यामध्ये गिरवी, फलटण या गटातील इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. माणिकराव सोनवलकर, संजीवनीराजे नाईक -निंबाळकर यांनीही मुलाखत दिली गेली. त्यानंतर खंडाळय़ाच्या मुलाखती देण्यात आल्या.

मंगळवारी मुलाखती सुरूच राहणार

यामध्ये खंडाळा पंचायत समितीचे सभापती नितीन भरगुडे-पाटील यांनीही मुलाखत दिली. वाईमधून नवीन चेहऱयांनी मुलाखती दिल्या. महाबळेश्वर तालुक्याच्या सायंकाळी मुलाखती घेतल्या गेल्या. मंगळवारीही मुलाखती सुरु राहणार आहेत.

इच्छूकांना केंडीत पकडण्याचा प्रयत्न

इच्छूकांनी कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शनही दाखवले असल्याने राष्ट्रवादी भवनानजिकचा परिसर वाहनांनी गजबजून गेला होता. इच्छूकांना मुलाखती दरम्यान, आडवेतिडवे प्रश्न विचारुन केंडीत पकडण्याचा प्रयत्न नेते मंडळीकडून सुरु होत असल्याचे इच्छूकांकडून मुलाखतीनंतर बाहेर आल्यावर सांगितले जात होते.

Related posts: