|Thursday, November 21, 2019
You are here: Home » विविधा » भारतातील सर्वात जुने हंपीचे विरूपाक्ष मंदिर

भारतातील सर्वात जुने हंपीचे विरूपाक्ष मंदिर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली:

सातव्या शतकातील हंपी या वैभवशाली राज्यात उभारले गेलेले विरूपाक्ष मंदिर हे भारतातील सर्वात जुने व दिर्घकाळ पूजाअर्चा होत राहिलेले मंदिर म्हणून ओळखले जाते. तुंगभदेच्या दक्षिण काठावरचे हे शिवमंदिर त्याच्या भव्यपणामुळे तसेच नऊ मजली गोपुरांमुळे जगभरात प्रसिध्द आहे. हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे व दरवर्षी येथे साजऱया होत असलेल्या वार्षिक उत्सावाला लक्षावाधींच्या संख्येने भाविक व पर्यटक येत असतात.

हंपी या वैभवशाली राज्याच्या इतिहासाशी या मंदिराची नाळ जुळलेली आहे. या मंदिरासर्भात अनेक कथा आजही सांगितल्या जातात. सातव्या शतकात या मंदिराच्या सुरूवातीला काही समाधी स्थळे होती व त्याची पुजा होत असे त्यानंतर मंदिराचा विस्तार होत गेला व येथे देवीदेवतांच्या प्रतिमा बसविल्या गेल्या तसेच दगडी बांधकामातील भव्य मंदीर, गोपुरे त्यावरील शिल्पकमाने नटविली गेली आहे.मुख्य मंदिरात दरवाज्यावर आठ फुटी दोन व्दारपाल आहेत व गाभाऱयात शिवलिंग आहे.

Related posts: