|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आशय हरवलेली नवी फिल्म म्हणजे आजचा मराठी चित्रपट

आशय हरवलेली नवी फिल्म म्हणजे आजचा मराठी चित्रपट 

कणकवलीपरदेशात गोष्ट सांगतात, माणसाच्या आयुष्यात डोकावतात, असे आपल्याकडील सिनेमातून होत नाही. जगभर हिंडल्याशिवाय चांगला सिनेमा कळत नाही. आशय हरवलेली नवी फिल्म म्हणजे आजचा मराठी चित्रपट. पण सिनेमा हा जाणीवपूर्वकच बघावा लागतो, असे स्पष्ट प्रतिपादन विख्यात चित्रपट अभ्यासक-संकलक-दिग्दर्शक अशोक राणे यांनी येथे आयोजित ‘सिनेमा-सिनेमा’ कार्यक्रमात केले.

येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाटय़गृहात युरेका सायन्स  क्लब आणि सुरेश कोदे सायन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिनेमा-सिनेमा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राणे यांचे मराठी, देशासह जगभरातील सिनेमांवरील अभ्यासपूर्ण विवेचन आणि दोन छोटय़ा फिल्मचे प्रदर्शन असे स्वरुप असलेल्या या कार्यक्रमात राणे यांनी सिनेमाचे तंत्र बदलले पण मंत्र हरवला असल्याचेही निरीक्षण नोंदविले. यावेळी कार्यक्रमाच्या संयोजक सुषमा केणी, प्रसाद घाणेकर, सौ. कोदे आदी उपस्थित होते.

 राणे म्हणाले, सिनेमा कळण्यासाठी माणसांनाही भेटत राहायला हवे. सिनेमाची समज हीच आयुष्याची समज. मी कोकणतलाच. वैभववाडी आचिर्ण्याचा. मला माहीत आहे, कोकणात सिनेमा कमी बघितला गेलाय. त्याकाळी नाटक, कविता, चित्रे ही करमणुकीची साधने होती. 18 व्या शतकात सिनेमाचा शोध लागला. युरोपमध्ये मॅजिक लँटर्न फिल्म जन्माला आली. मॅजिक लँटर्नमध्ये ‘तहानलेला कावळा’ ही गोष्ट सांगितली. 1860 मध्ये पहिल्यांदा मॅजिक लँटर्न भारतात आणली गेली. त्याला भारतात शांभरी खरोलिका असे म्हटले गेले.

फ्रान्समध्ये पॅरिस जवळ लिमिओ नावाच्या शहरात ऍलेक्झँडर याने स्टुडिओ सुरू केला. त्यात चाळीस माणसं काम करीत होती. मार्च 1895 मध्ये पॅरिसला सिनेमाचा जन्म झाला. तो एक मिनिटाचा होता. अशा अठरा फिल्म त्यावेळी दाखविल्या गेल्या. 1895 ते 1927 पर्यंत सिनेमा सायलेंट होता. ‘अयोध्येचा राजा’ हा मराठीतला पहिला सिनेमा. पण हा सिनेमाचा इतिहास समजून घेताना आपणही सिनेमा बनवू शकतो हीसुद्धा जिद्द बाळगली पाहिजे, असेही राणे यांनी सांगितले.

Related posts: