|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शेतकऱयांच्या हितासाठी अनेक महत्वकाक्षी योजना

शेतकऱयांच्या हितासाठी अनेक महत्वकाक्षी योजना 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील श्री गुरूदत्त शुगर्स कारखाना नेहमीच शेतकऱयांच्या हिताच्या अनेक महत्वकांक्षी योजना राबवत असल्यामुळे शेतकरी गुरूदत्त शुगर्सकडे ऊस गळीतास पाठवत आहेत. 2016-17 या गळीत हंगामामध्ये 15 जानेवारी अखेर 3 लाख 48 हजार 310 मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी 12.83 टक्के उताऱयाने 4 लाख 39 हजार 430 क्विटंल साखर पोत्यांचे उत्पादन झाल्याची माहिती, कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी दिली.

31 डिसेंबर 2016 अखेर गळीतास आलेल्या उसास पहिला ऍडव्हान्स विना कपात 2858 रूपये प्रति मेट्रीक टन प्रमाणे शेतकऱयांच्या बँक खात्यावर यापूर्वी जमा केलेला आहे. 1 ते 10 जानेवारीपर्यंत 48 हजार 984 मेट्रीक टन गळीतास आलेल्या उसाचे बिल 2858 रूपये प्रमाणे 13 कोटी 99 लाख 96 हजार 272 रूपये अवघ्या पाचव्या दिवशी बँक खात्यावर जमा केले आहेत.

उच्चांकी ऊस दराचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱयांनी ऊस नोंदणी केलेल्या नाहीत. त्यांच्या करीता पुरवणी ऊस नोंदणी घेण्याचे काम चालू आहे. गुरूदत्त शुगर्स शेतकऱयांच्या शेतातील नोंदीचा सर्व ऊस गळीत केल्या शिवाय कारखाना बंद करणार नाही, असे घाटगे यांनी सांगितले.

कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱया शेतकऱयांना दरवर्षी एक लाखाचा अपघाती विम्याचे संरक्षण दिले जाते. गेल्या आठ वर्षात 13 शेतकऱयांना विम्याच्या माध्यमातून कारखान्याने अपघात ग्रस्त शेतकऱयांच्या कुटूंबाला आधार देण्याचे काम केले आहे.

2017 मध्ये गुरूदत्त कारखान्याने कृषी दिनदर्शिकेचे प्रकाशन केले असून यामुळे शेतकऱयांना शेतीचे नवीन तंत्रज्ञान, जमिनीची पूर्व मशागत कशी करावी, कोणत्या हिरवळीच्या खताचा वापर करावा, उसाच्या वेगवेगळ्या जातीचे बियाणे निवड, ऊस लागण पद्धत, रासायनीय खतांची फवारणी, आळवणी, स्त्राrमूर्ती सेंद्रिय, जैविक, गांडूळ खते वापरण्याची पद्धती व उढस उत्पादन वाढीचे महत्त्व तसेच तण नाशक वापरताना घ्यावयाची काळजी, खोडवा व्यवस्थापन तंत्रज्ञान, ठिंबक सिंचनाची सविस्तर माहिती, उढस पिकाबाबत सर्वकष तपशिल देण्यात आला आहे. या दिनदर्शिकेचे स्वागत शेतकरी वर्गातून होत आहे.

एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, धीरज घाटगे, संचालक संजय गायकवाड, बबन चौगुले, बाळासाहेब पाटील (मलिकवाड), धोंडिराम नांगणे, सखाराम कदम, जे. आर. पाटील (दानवाडकर), कारखान्याचे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related posts: