|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आरक्षित जागेवरील उमेदवार निवडून आणावा

आरक्षित जागेवरील उमेदवार निवडून आणावा 

प्रतिनिधी/ कराड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची बैठक भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण रविढोणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मोर्चाचे सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष उपस्थित होते. निवडणुकीत ज्या ठिकाणी अनुसूचित जातीचे गट व गण आरक्षित आहेत, त्या ठिकाणी सक्षम महिला वा पुरूष उमेदवार देऊन तो निवडून आणण्याचा ठराव एकमताने करण्यात आला.

यावेळी विक्रम पावसकर यांचा माण तालुका मोर्चाचे अध्यक्ष मंगेश खरात तर डॉ. रविढोणे यांचा कराड उत्तर तळबीड गणाचे उमेदवार अजित साठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विक्रम पावसकर म्हणाले, भाजपाच्या अनुसूचित मोर्चाचे सक्षमपणे व संघटनात्मक काम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रविढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. भाजपामध्ये पक्ष संघटन हेच पक्षाचे ध्येय डोळ्य़ासमोर ठेवून काम करणाऱया कार्यकर्त्यांच्या पाठीमागे पक्ष सदैव ताकदीनिशी उभा राहतो.

डॉ. रविढोणे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाच झेंडा फडकवेल, असा विश्वास व्यक्त केला.

प्रास्ताविक मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी थोरात यांनी केले. आभार जिल्हा उपाध्यक्ष राज सोनावले यांनी मानले. यावेळी माजी उपाध्यक्ष रावसाहेब क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीस मोर्चाचे पदाधिकारी अमोल थोरात, बाबासाहेब देटके, चंद्रकांत भिसे, सागर लादे, बाळू वायदंडे, अर्जुन बोंडवे, कराड दक्षिण उपाध्यक्ष विनोद भिसे, कराड उत्तरचे अध्यक्ष संजय शिरसट, जावली अध्यक्ष शिवाजी आगाटे, मोर्चाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: