|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » leadingnews » काळवीट शिकारप्रकरणी अखेर सलमान दोषमुक्त

काळवीट शिकारप्रकरणी अखेर सलमान दोषमुक्त 

ऑनलाईन टीम / जोधपुर :

काळवीट शिकारप्रकरण सलमानविरोधात जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली असून या केसमध्ये जोधपूर न्यायालयाने सलमानला दोषमुक्त केले आहे. त्यामुळे सलमानला मोठा दिलासा मिळाला आहे.

18 वर्ष जुन्या केससाठी सलमान जोधपुरात दाखल झाला होता. 1998 साली ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा आरोप सलमानवर होता. मात्र, न्यायालयाने त्याला दिलासा दिला असून, याप्रकरणात त्याला दोषमुक्त केले आहे.