|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News » पश्चिम बंगालमधील आंदोलनाला हिंसक वळण, दोघांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील आंदोलनाला हिंसक वळण, दोघांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / पश्चिम बंगाल :

पश्चिम बंगालमध्ये भांगार परिसरातील विद्युत प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या विरोधाने मंगळवारी हिंसक वळण घेतले. या हिंसाचारात दोघांचा मृत्यूही झाला.

पोलिसांनी गोळीबार केल्याचा आंदोलकांनी आरोप केला आहे. पोलिसांनी हा आरोप फेटाळला आहे. संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या दहा गाडय़ा पेटवल्या. या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या एका आंदोलकाचे नाव मुफीजुल अली खान आहे. 26 वर्षी मुफीजुल हा कोलकात येथील रहिवासी होता. मुफीजुलच्या पाठीवर गोळी लागल्याची जखम आढळल्याचे रूग्णालयाने म्हटले आहे.