|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मनच सांगते स्वधर्म

मनच सांगते स्वधर्म 

मुलांच्या आयुष्यातील पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे योग्य त्या अभ्यासक्रमाची निवड. आपल्याला असे आढळून येते की बहुसंख्यवेळा या संदर्भात पालक आपली आवड निवड पाल्यावर लादतात. रमणचे गणित आणि विज्ञान हे आवडते विषय आहेत. या विषयात त्याचे मन रमते. त्याला या विषयात उत्तम गुणही मिळतात. त्याला इंजिनिअर व्हायचे आहे. पण त्याचा इंजिनिअEिरग कॉलेजमधील प्रवेश केवळ दोन गुणांनी हुकला. त्याने पुढे आयुष्यात अखंड परिश्रम करून मोठे यश मिळवले आणि बक्कळ पैसाही मिळवला. आता आपला मुलगा पारस याने इंजिनिअर व्हावे असे रमणला वाटते. पण पारसला इंजिनिअर होण्यात तिळमात्र रस वाटत नाही. मुळात शालेय पाठय़पुस्तकी विषयात आणि अभ्यासात त्याचे मनच रमत नाही. त्याला मैदानी खेळ आवडतात. त्याला फुटबॉलपटू बनायचे आहे. पण रमणने खूप पैसा खर्च करून पारसला इंजिनिअरिंग कॉलेजला बळेबळेच घातले. पण पारस अनेक प्रयत्न करूनही इंजिनिअरिंगची पहिल्या वर्षाची परीक्षाही पास होऊ शकलेला नाही.

गणेशचे आई वडील दोघेही ख्यातनाम डॉक्टर आहेत. त्यांचे स्वतःचे मोठे हॉस्पिटल आहे. गणेश अभ्यासात हुशार आहे. त्याच्या पालकांना वाटते की गणेशने डॉक्टर व्हावे. पण गणेशला वैज्ञानिक होऊन सौर ऊर्जा क्षेत्रात संशोधन करावयाचे आहे. त्याला डॉक्टर व्हायचे नाही. याला आणखी एक कारण म्हणजे त्याला हॉस्पिटल मधील वातावरण आणि औषधांचा वास यांचा तिटकारा आहे. त्याला रक्त पाहिले की भोवळ येते. आता सांगा, गणेश चांगला डॉक्टर बनू शकेल काय?

सचिनचे वडील रमेश तेंडुलकर मराठीतील प्रख्यात साहित्यिक. पण सचिनला शालेय अभ्यासात रस नाही आणि क्रिकेट या खेळात विशेष रस आणि क्षमताही आहे हे त्यांनी ओळखले. साऱया घरानेच त्याच्या क्रिकेटला प्रोत्साहन दिले. त्यामुळेच भारतरत्न सचिन तेंडुलकर या क्रिकेट विश्वातील आजवरच्या सर्वश्रे÷ रत्नाचा आपल्याला लाभ झाला. प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलिल कुलकर्णी हे एक हुशार विद्यार्थी. त्याचबरोबर बालपणापासूनच त्यांचे मन संगीतातही रमत असे. लहानपणीच अनेक वाद्यांवर अचंबित करणारे प्रभुत्व त्यांनी प्रस्थापित केले. पुढे वैद्यकीय पदवी उत्तम गुणांनी संपादन केल्यावर त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये काम करायलाही सुरुवात केली. पण त्याचवेळी त्यांचे मन मात्र संगीताकडे धाव घेत होते. मनाची घुसमट होत होती. अखेर वैद्यकीय क्षेत्राला रामराम ठोकून त्यांनी संगीत क्षेत्रात काम करायचे ठरवले. त्यावेळी अनेकांना त्यांचा हा निर्णय पटला नाही. त्यांनी तशी टीकाही केली. त्यामुळे मन पुन्हा अस्वस्थ झाले. अखेर पुलंनी त्यांना धीर देत म्हटले, ‘हे बघ, पुण्याच्या गल्लोगल्ली किती डॉक्टर आहेत आणि संगीत दिग्दर्शक किती आहेत? आपल्या मनाचा कौल हाच स्वधर्म, बाकी सब झु”’

Related posts: