|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » काश्मिरी पंडितांच्या वापसीबाबत राज्य विधानसभेत प्रस्ताव संमत

काश्मिरी पंडितांच्या वापसीबाबत राज्य विधानसभेत प्रस्ताव संमत 

वृत्तसंस्था /श्रीनगर :

जम्मू-काश्मीर विधानसभेने गुरुवारी एक प्रस्ताव संमत केला, यात काश्मिरी पडित आणि इतर स्थलांतरितांच्या वापसीचा मुद्दा नमूद आहे. लोकांची खोऱयात वापसी व्हावी, यासाठी आवश्यक वातावरण तयार केले जाईल असे प्रस्तावात म्हटले गेले आहे. काश्मिरी पंडित हिंसाचारामुळे हतबल होत काश्मीर खोऱयातून जाऊन 27 वर्षे उलटली आहेत.

पंडित आणि खोऱयातून बाहेर पडलेले इतर स्थलांतरित पुन्हा परतावेत यासाठी एक प्रस्ताव संमत केला जावा असे सभागृहात माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी वक्तव्य केले. 27 वर्षांपूर्वी जे झाले ते दुर्दैवी होते, काश्मिरी पंडित, शिख आणि काही मुस्लीम समुदायाच्या लोकांना हतबल होऊन काश्मीरमधून जावे लागले असे त्यांनी म्हटले. राज्याचे संसदीय कामकाज मंत्री अब्दुल रहमान वीरी यांनी प्रस्ताव मांडला आणि तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.

पंडितांसाठी कविता

काश्मिरी पंडितांच्या खोऱयातून पलायनाला 27 वर्षे पूर्ण झाली. यावेळी अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटर खात्यावर गुरुवारी चित्रफीत पोस्ट केली. ज्यात ते एक कविता वाचताना दिसून येत आहे. त्यांनी ही कविता ‘फैलेगा हमारा मौन’ शीर्षकाने काश्मिरी पंडितांना समर्पित केली आहे. त्यांनी “27 वर्षांनंतर देखील स्वतःच्या देशातच शरणार्थी आहेत, त्यांच्या शांत चीत्कारावर एक कविता शेअर करा’’ अशी टिप्पणी केली. अनुपम खेर हे देखील काश्मिरी पंडित आहे.

त्यांनी जी चित्रफीत पोस्ट केली आहे, ती चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी दिग्दर्शित केली आहे. काश्मिरी पंडित मौन बाळगण्यास हतबल आहेत, परंतु आता ते आणखी गप्प राहणार नाहीत असे खेर यांनी चित्रफितीत म्हटले.

 

Related posts: