|Friday, November 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » एडवर्ड स्नोडेनला 2020 पर्यंत रशियात वास्तव्याची अनुमती

एडवर्ड स्नोडेनला 2020 पर्यंत रशियात वास्तव्याची अनुमती 

मॉस्को :

रशियाच्या प्रशासनाने अमेरिकेची गुप्त माहिती उघड करणाऱया एडवर्ड स्नोडेनचा आपल्या देशात वास्तव्याचा मंजूर कालावधी 3 वर्षांनी वाढविला आहे. स्नोडेनला रशियात राहण्याची अनुमती 2020 पर्यत वाढविण्यात आल्याचे रशियन विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जकारोवा यांनी सांगितले. याआधी त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये स्नोडेनला वाढीव कालावधी मिळेल असा संकेत दिला होता. रशियन विभागाने जानेवारीच्या प्रारंभीच स्नोडेनच्या वास्तव्याची मुदत तीन वर्षांसाठी वाढविल्याची पुष्टी स्नोडेनच्या वकील ऐनातोली कुचेराना यांनी दिली. स्नोडेनने 2013 साली अमेरिकेची हेरयंत्रणा नॅशनल सिक्युरिटी एजेन्सीची माहिती उघड केली होती. त्याचवर्षी रशियाने स्नोडेनला आश्रय दिला होता. यावर्षी त्याचा परवाना संपला होता, आता तो 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. जर स्नोडेन 2018 पर्यंत रशियात राहिला तर तो तेथील नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र होणार आहे.

Related posts: