|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बहुजनांच्या क्रांतीचा यल्गार

बहुजनांच्या क्रांतीचा यल्गार 

प्रतिनिधी /सांगली :

जाती जातीत भांडणे लावून फडणवीस सरकार आपली पोळी भाजून राज्य करते.  आपण मात्र जातीच्या चौकटीत राहून एकमेकांच्या जीवावर उठलो आहोत. आता ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि 85 टक्के बहुजन समाज एक झाला तरच आपल्या  सर्व मागण्या मान्य होतील. त्यामुळे आता बहुजनांनो  एक साथ लढू या अशी व्रजमुठ बांधून बहुजन समाजांच्यावतीने सांगलीत भव्य असा हजारोंच्या संख्येचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला या मोर्चाचे प्रणेते बामसेफचे नेते वामन मेश्राम, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू हाजी हजरत नवमानी, लिंगायत समाजाचे धर्मगुरू कोर्णेश्वर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा झाला. बहुजनांची एकी हेच या मोर्चाचे ब्रीद वाक्य होते. आणि तसा बहुजनांच्या एकीचा क्रांतीचा यल्गार यावेळी दाखविण्यात आला.

गेल्या दोन महिन्यापासून जिल्हय़ातील सर्व बहुजन समाजाला एकत्रित करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक प्रयत्न करत होते. या संयोजकांच्या प्रयत्नांना गुरूवारी  यश प्राप्त झाले अठरा पगड, बारा बलुतेदार, भटके विमुक्त, मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत,जैन यांच्यासह सर्व समाजाचे लोक या मोर्चात सहभागी झाले आणि आपण सर्वजण एक आहेत हे त्यांनी दाखविले. त्यामुळे सर्व बहुजन समाज एक झाल्याचा प्रत्यय या मोर्चात सांगलीकरांना आला.

या मोर्चाची सुरवात सांगलीतील कामगार भवन पासून झाली. तर समाप्ती कर्मवीर चौकात झाली. हा मोर्चा मार्ग संपूर्णपणे मोर्चेकऱयांनी भरला होता. यामध्ये सर्व समाजाचे बांधव आणि महिला मोठय़ा संख्येने त्यामध्ये सहभागी झाल्याने हजारोंच्या संख्येने हा मोर्चा निघाला. त्यामुळे संयोजकांचे अनेक नेत्यांनी अभिंनदन केले आणि बहुजनांच्या डोक्यात आता विकासाचे विचार सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Related posts: