|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » उत्तरप्रदेशात जातीय राजकारण तापले

उत्तरप्रदेशात जातीय राजकारण तापले 

ऑनलाईन टीम / उत्तरप्रदेश :

उत्तर प्रदेशमध्ये जातीचा मुद्दा अजूनही महत्त्वाचा ठरतो. जातीचे राजकारण तेथे नेहमीच पहायला मिळते निवडणूकीच्या काळात तर अनेक लहान जाती- उपजातीही प्रबळ झालेल्या दिसतात. राजकीय पक्षाच्या नेतृत्वापेक्षा ‘ जात’ या घटकावर छोटय़ा – छोटय़ा पक्षांना ‘सुगीचे दिवस’ येतात आणि त्याच फायदाही घेतला जातो.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीतही असे छोटे पक्ष त्यांचे अस्तित्व दाखवून देण्याच्या तयारीत असून निवडणुकीवर त्याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजप व काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांनीही अशा जातीय राजकरणाचा आधार वाटत असून, विशिष्ट जातींच्या पाठिंबा मिळवण्यासाठी आघाडीचे राजकारण हे पक्ष करीत असतात.